Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश ओसामा बिन उत्तम अभियंता, कार्यालयात लावले छायाचित्र; सरकारी अधिकारी बडतर्फ

ओसामा बिन उत्तम अभियंता, कार्यालयात लावले छायाचित्र; सरकारी अधिकारी बडतर्फ

Subscribe

दहशतवादी ओसामा बिन लादेनला आदर्श मानल्याने उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (UPPCL) मधील उपविभागीय अधिकाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे. या अधिकाऱ्याने त्याच्या कार्यालयात दहशतवादी ओसामा बिन लादेनचे छायाचित्र लावले होते, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.

यूपीपीसीएलचे अध्यक्ष एम देवराज यांनी रवींद्र प्रकाश गौतम यांना पदावरून काढून टाकण्याचे आदेश चौकशीनंतर दिले होते. चौकशीत असे आढळून आले की, गौतम अल-कायदा प्रमुख ओसामाला आपला आदर्श मानत होता. एवढंच नव्हे तर दक्षिणांचल या त्याच्या कार्यालयात त्याचे छायाचित्र लावले होते. विद्युत वितरण निगमचे एमडी अमित किशोर यांनी याबाबत पीटीआयला माहिती दिली.

- Advertisement -

एका वरिष्ठ विभागीय अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गौतमने जून 2022 मध्ये फर्रुखाबाद जिल्ह्यातील कायमगंज उपविभाग-II मध्ये पोस्टिंग असताना हे छायाचित्र लावले होते. त्याच्या ऑफिसचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, दक्षिणांचल विद्युत वितरण निगमने एसडीओला निलंबित केले आणि चौकशी सुरू केली. वीज विभागाच्या कर्मचार्‍यांचा हवाला देत फर्रुखाबादच्या एका अहवालात म्हटले आहे की गौतमने ओसामाची मूर्तीही बनवत होता.

यूपीपीसीएलचे चेअरमन देवराज यांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे की, गौतमने उच्च अधिकार्‍यांच्या विरोधात असभ्य भाषा वापरली आहे, यामुळे तो शिक्षेस पात्र आहे. “त्याने ओसामा बिन लादेनला सर्वोत्कृष्ट अभियंता मानणे आणि त्याचा फोटो कार्यालयात चिकटवणे हे अत्यंत अनुशासनात्मकतेचे लक्षण आहे. सार्वजनिक सेवेता सेवक असूनही, त्याने देशविरोधी कृत्य केले आहे आणि असे कृत्य केले आहे जे महामंडळाच्या विरोधात होते आणि विभागाची प्रतिमा कलंकित झाली आहे, असं सांगत त्याला बडतर्फ करण्यात आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -