घरक्राइमधक्कादायक! नववीतील विद्यार्थ्याकडून सातवीतील विद्यार्थिनीवर बलात्कार, पीडिता गरोदर राहिल्याने बाब उघड

धक्कादायक! नववीतील विद्यार्थ्याकडून सातवीतील विद्यार्थिनीवर बलात्कार, पीडिता गरोदर राहिल्याने बाब उघड

Subscribe

Rape Case | संबंधित मुलाविरोधात पोक्सो अंतर्गत आणि ३७६ कलमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून त्याला रिमांडहोममध्ये पाठवण्यात आले आहे. तर, पीडितेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Rape Case | सातारा – इयत्ता नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार (Rape) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उजेडात आला. साताऱ्यामध्ये ही धक्कादायक घटना घडली असून संबंधित विद्यार्थ्याविरोधात पोक्सो अंतर्गत आणि ३७६ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसंच, त्याला रिमांडहोममध्ये पाठवण्यात आले आहे. (Minor Rape in Satara)

पीडित शाळकरी मुलीची मासिक पाळी अनियमित झाल्याने तिची वैद्यकीय तपासणी करण्याकरता तिच्या आईने तिला डॉक्टरांकडे नेले. डॉक्टरांनी तिला सोनोग्राफीचा सल्ला दिला. सोनोग्राफी केल्यानंतर आलेल्या अहवालामुळे सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. कारण, सोनोग्राफीच्या अहवालानुसार ती चार महिन्यांची गरोदर होती. इयत्ता सातवीत शिकणारी मुलगी गरोदर राहिल्याने या प्रकरणाचा तपास गांभीर्याने आणि वेगाने सुरू झाला.

- Advertisement -

पीडित मुलीला विश्वासात घेऊन तिच्यावर बेतलेल्या आपबितीबाबत विचारण्यात आले. सप्टेंबर महिन्यात इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका मुलाने गोड बोलून तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती तिने घरच्यांना आणि पोलिसांना दिली. हे दोन्ही विद्यार्थी वेगवेगळ्या शाळेत शिकत असून या दोघांची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. या ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. मैत्रीचा गैरफायदा घेत मुलाने तिच्यावर बलात्कार केला.

संबंधित मुलाविरोधात पोक्सो अंतर्गत आणि ३७६ कलमाप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून त्याला रिमांडहोममध्ये पाठवण्यात आले आहे. तर, पीडितेवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

कल्याण डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

डोंबिवली-ठाकुर्लीदरम्यानच्या खाडीकिनारी परिसरात भरदिवसा बारावीत शिकणार्‍या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर दोन तोतया पोलिसांनी बलात्कार केल्याची खळबळजनक घटना २८ जानेवारी रोजी घडली होती. याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

हेही वाचा – बारावीच्या विद्यार्थिनीवर तोतया पोलिसांचा बलात्कार; डोंबिवली-ठाकुर्लीदरम्यानची धक्कादाय घटना

केरळमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीवरच बलात्कार

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीवर बलात्कार झाल्याची दुर्दैवी घटना केरळमध्ये काही दिवसांपूर्वी घडली होती. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिकेतून घेऊन जात होते. त्यावेळी रुग्णवाहिकेतील वॉर्डबॉयने संबंधित महिलेवर बलात्कार केला. महिलेला त्रिशूर मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात येत असताना ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित वॉर्डबॉयला अटक केली.

हेही वाचा – केरळमध्ये आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मुलीवरच बलात्कार; आरोपी अटकेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -