घरमहाराष्ट्रआंबेनळी अपघात : मृत बस चालकाविरोधात गुन्हा दाखल

आंबेनळी अपघात : मृत बस चालकाविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

महाबळेश्वर – पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाट अपघात प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत. मात्र ५ महिन्यानंतर हे प्रकरण पुन्हा समोर आले आहे. मृत बस चालक प्रशांत भांबीड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाबळेश्वर – पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये मोठा बस अपघात झाला होता. या अपघातामध्ये ३२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर या दुर्घटनेमध्ये प्रकाश सावंत देसाई हे एकमेव व्यक्ती वाचली होती. त्यानंतर या अपघाताप्रकरणी प्रकाश सावंत यांच्यावर संशय वक्त केला जात होता. मात्र ५ महिन्यानंतर हे प्रकरण पुन्हा समोर आले आहे. मृत बस चालक प्रशांत भांबीड यांच्यावर पोलादपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाला एक नवं वळण मिळालं आहे.

नेमके काय घडले होते?

बाळासाहेब सावंत दापोली कृषी विद्यापीठाचे कर्मचारी २९ जुलै रोजी विकेंडसाठी बसने महाबळेश्वर सहलीसाठी निघाले होते. पोलादपूर तालुक्यातील दाभिळ आणि आंबेमाची गावालगतच्या आंबेनळी घाटात ही बस ३०० फूट दरीत कोसळून ३२ प्रवासी दगावले आणि एकजण वाचले होते. काही क्षणांतच काळाने घाला घालून विकेंडचा शनिवारीच दी एण्ड केला. पोलादपूरला ९.३० वाजता ३३ जणांनी फोटो काढून सहलीच्या आनंदाची झलक दाखवली. त्यानंतर १०.३० वाजता भीषण अपघात झाला. काही वर्षांपूर्वी झी नेटवर्कचे झैदी यांची कारही याच ठिकाणाहून दरीत कोसळून ७ जण मृत्यूमुखी पडले होते. याच ठिकाणी संरक्षक कठडा उभारण्याची मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र, पोलादपूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने याची गंभीर दखल कधीच घेतली नाही.

- Advertisement -

‘त्या’ चार तासांत काय घडलं ?

  • चौथा शनिवार आणि रविवार म्हणून कोकण कृषी विद्यापीठाचे ४० जण महाबळेश्वरला सहलीसाठी निघाले होते.
  • बसमध्ये सीट्स कमी असल्यामुळे ४० ऐवजी ३४ जणांना घेऊन ही बस ६.३० वाजता दापोलीवरून महाबळेश्वरच्या दिशेने निघाली.
  • कोकण कृषी विद्यापीठाचीच बस भाड्याने घेण्यात आली होती.
  • निघालेली ही खासगी बस सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास पोलादपूर-आंबेनळी घाटातून जात होती.
  • निघालेली ही बस डाव्या बाजुने रस्त्याच्या कडेला असलेल्या मातीच्या ढिगार्‍यावरुन खोल दरीत कलंडली.
  • कळायच्या आतच ही बस 300 फूट खोल दरीत कोसळली.
  • अपघात घडला ते ठिकाण अवघड वळणाचे किंवा अपघातग्रस्त ठिकाण नव्हते.
  • दरीत कोसळत असताना, त्याच बसमध्ये प्रवास करत असलेले प्रकाश सावंत-देसाई हे बसमधून बाहेर फेकले गेले.
  • जिथे पडले तिथून बस खूप खाली कोसळली होती.
  • येताच हाताला लागेल त्याचा आधार घेत प्रकाश सावंत सुखरूप वर आले.
  • त्यांनी जवळ असलेल्या त्यांच्या मोबाईलवरुन नातेवाईकांना फोन लावण्याचा प्रयत्न केला. रेंज नसल्यामुळे त्यांचा कुणाशीच संपर्क होऊ शकला नाही.

    वाचा – पोलादपूर बस दुर्घटना; ३२ जणांचा मृत्यू तर एक जण बचावला

    वाचा – असा झाला पोलादपूरचा अपघात


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -