घरमहाराष्ट्र'शिवद्रोही' छिंदम निवडणूक जिंकल्यानंतर 'महाराजांच्या चरणी'

‘शिवद्रोही’ छिंदम निवडणूक जिंकल्यानंतर ‘महाराजांच्या चरणी’

Subscribe

महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा शिवद्रोही छिंदम निवडणूक जिंकल्यानंतर महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ९ मधून श्रीपाद छिंदम विजयी झाला.

महाराजांबद्दल अपशब्द वापरणारा शिवद्रोही छिंदम निवडणूक जिंकल्यानंतर महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक ९ मधून श्रीपाद छिंदम विजयी झाला. महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर छिंदम तडीपार होता. त्यानंतर तो आज नगरमध्ये दाखल झाला. यावेळी बिनडोक आणि मुर्ख छिंदमला उपरती झाली त्यानंतर तो महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला. सकाळी नगरमध्ये आल्यानंतर श्रीपाद छिंदमनं  छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. यावेळी त्यानं या महापुरूषांच्या आशिर्वादामुळे आपण विजयी झालो असं म्हटलं. दरम्यान, प्रभाग क्रमांक १ मधून शिवद्रोही छिंदम हा २ हजार मतांनी विजयी झाला आहे. महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे श्रीपाद छिंदमला अटक करण्यात आली होती. शिवाय, त्याला तडीपार देखील करण्यात आलं होतं. पण आज तो नगरमध्ये दाखल झाला.

निवडणुकीच्या दिवशी श्रीपाद छिंदमच्या भावानं एव्हीएम मशीनची पुजा केली होती. त्यावरून त्याला देखील अटक करण्यात आली. महाराजांबद्दल अपशब्द वापरल्यानंतर त्याला भाजपनं पक्षातून काढून टाकलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -