घरट्रेंडिंग१२ डिसेंबर: महाराष्ट्रातील या तीन दिग्गजांचा वाढदिवस!!

१२ डिसेंबर: महाराष्ट्रातील या तीन दिग्गजांचा वाढदिवस!!

Subscribe

१२ डिसेंबर दिग्गजांचा दिवस. त्यांना लाख लाख शुभेच्छा!!

१२ डिसेंबर!! महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या व्यक्तींचा आज जन्मदिवस!! राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, देशाचे माजी सरंक्षण मंत्री, कृषीमंत्री आणि महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झालेले शरद पवार, महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात भाजप पक्ष रुजवणारे माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि दाक्षिणात्या सुपरस्टार रजनीकांत म्हणजेच शिवाजीराव गायकवाड. महाराष्ट्राच्या मातीत जम्नलेल्या या तिन्ही दिग्गजांनी राज्याचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. या तिघांचीही नावं घेतल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून येतो. आपल्या वेगळ्या कार्यशैलीने तीनही दिग्गजांनी आपापल्या क्षेत्रात एक वेगळी उंची गाठली. त्यामुळेच ते अनेकांसाठी आदर्श ठरलेले आहेत.

शरद पवार: राजकारणातील भीष्मपितामह!!

बारामती तालुक्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शरद पवारांचा राजकीय प्रवास देखील थक्का करणारा आणि हवाहवासा वाटणारा!! देशाच्या राजकारणात देखील आपल्या कार्यकर्तृत्वानं शरद पवारांनी आपली वेगळी अशी ओळख निर्माण केली. मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री वा केंद्रीय कृषीमंत्री या तिन्ही पदांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. राजकारणातील मुरब्बी असं हे व्यक्तिमत्व. वयाच्या ७५व्या वर्षानंतर देखील शरद पवारांचा राजकारणातील आवाका पाहता तरूणांना देखील लाज वाटते. राजकारणातील ‘चालतं बोलतं विद्यापीठ’ म्हणून देखील शरद पवारांकडे राष्ट्रीय पातळीवर पाहिलं जातं. दूरदृष्टी असलेला हा नेता त्याच तडफेनं, पोटतिडकीनं सामान्यासाठी झगडताना दिसतो. ‘जाणता राजा’ म्हणून लोक त्यांचा गौरव करतात यातच सर्व काही आलं. राजकारण हे जरी पिंड असलं तरी सर्वच क्षेत्रांचा दांगडा अभ्यास. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिकेटचं मैदान गाजवण्यामध्ये शरद पवारांनी कसूर नाही केली. जीवनात अनेक चढ – उतार पाहिल्यानंतर देखील पाय जमिनीवर असणाऱ्या शरद पवारांना ‘माय महानगर’कडून वाढ दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!!

- Advertisement -

भाजपला खेड्यापाड्यात नेणारे गोपीनाथ मुंडे

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे. बीडमध्ये शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या गोपीनाथ मुंडेंनी राजकारणाचं मैदान देखील त्याचं तडफेनं मारलं. महाराष्ट्रात भाजपच्या वाढीमध्ये गोपीनाथ मुंडेंचा सिंहाचा वाटा. स्वर्गीय प्रमोद महाजनांच्या मदतीनं गोपीनाथ मुंडेंनी राज्यात भाजप वाढवली, रूजवली ही गोष्ट कुणीही नाकारू शकत नाही. शिवसेना – भाजप युती घट्ट, दृढ करण्यामागे गोपीनाथ मुडेंची मोठी भूमिका. युती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ‘गुन्हेगारांचा कर्दनकाळ’ अशी ख्याती त्यांनी मिळवली. बीड सारख्या मागास जिल्ह्याला राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू करण्यामागे गोपीनाथ मुंडेचा मोठा हात. बीडमध्ये गेल्यानंतर त्याची प्रचिती येते. अपघाती निधनानंतर देखील बीडमध्ये गेल्यानंतर बीड म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि गोपीनाथ मुंडे म्हणजे बीड हे समीकरण आजही कायम आहे. गोपीनाथ मुडेंना माय महानगरकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

सुपरस्टार रजनीकांत…

थलायवा म्हणजेच रजनीकांत. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील नायक? दक्षिणेतल्या चाहत्यांसाठी देव माणूसच!! रजनीकांत यांना दक्षिणेमध्ये अभिनेत्यापेक्षा देव मानलं जातं. पण, अभिमानाची बाब म्हणजे चित्रपट सृष्टीमध्ये दिग्विजय करत असलेला हा मुळचा महाराष्ट्राचा आहे. शिवाजीराव गायकवाड असं रजनीकांत यांचं मुळ नाव. एसटीतील वाहक ते सुपरस्टार असा हा प्रवास स्वप्नवत वाटावा असाच. कार्यक्षेत्र जरी दक्षिणात्य चित्रपट सृष्टी असली तरी मराठीशी ‘नाळ’ मात्र त्यांची कायम आहे. अनेकांच्या तोंडून, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून या गोष्टी समोर आलेल्या आहेत. लोकांनी भरभरून दिलेलं प्रेम सर्व काही सांगून जातो. या थलायवाला ‘माय महानगर’च्या लाख लाख शुभेच्छा!!

वाचा – शरद पवार: देशाला दिशा देणारा साधा माणूस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -