घरमहाराष्ट्रसिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, ३० डिसेंबरला मतदान

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले, ३० डिसेंबरला मतदान

Subscribe

३१ डिसेंबरला मतमोजणी, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची प्रतिष्ठा पणाला

तब्बल सहा वेळा स्थगित झालेली व सर्वांचेच लक्ष लागून राहीलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून ३० डिसेंबर रोजी मतदान तर ३१ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत जिल्हा बँक विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्या सोबत अनेक दिग्गजांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

३० डिसेंबरला मतदान

जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची पाच वर्षांची मुदत मे २०२० मध्ये संपली होती. परंतु कोरोनामुळे मुदत वाढ मिळत गेली. तब्बल सहा वेळा निवडणूक प्रकिया स्थगित होऊन मुदतवाढ मिळाली होती. जवळजवळ दीड वर्ष मुदत वाढ मिळाली. त्यामुळे निवडणूक कधी लागणार याकडे लक्ष लागून राहिले होते. अखेर जिल्हा बँक निवडणूक अधिकारी तथा कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवार दिनांक २९ नोव्हेंबर पासून निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे

- Advertisement -

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या एकूण १९ जागांसाठी निवडणूक होत असून त्यासाठी २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत कुडाळ उपविभागीय कार्यालय येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत नामनिर्देशन दाखल करणे, ६ डिसेंबरला नामनिर्देशन पत्रांची छाननी करणे, छाननी नंतर वैध नामनिर्देशन पत्राची यादी ७ डिसेंबरला प्रसिद्ध करणे, ७ डिसेंबर ते २१ डिसेंबर पर्यंत उमेदवारी मागे घेणे, २२ डिसेंबर रोजी निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराची अंतिम यादी प्रसिद्ध करणे व चिन्ह वाटप करणे, ३० डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान आहे. हे मतदान सर्व तालुका तहसील कार्यालयात मतदान केंद्रावर मतदान होणार आहे, ३१ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे मतमोजणीचे ठिकाण अद्याप जाहीर केलेले नाही

१९ जागांसाठी निवडणूक

जिल्हा बँक संचालक मंडळाच्या एकूण १९ जागांसाठी निवडणूक होणार असून यामध्ये संलग्न सहकारी शेतीपूरवठा, विविध कार्यकारी, संयुक्त शेती, फळबागा विकास, धाण्यापेढ्या सभासद मतदार संघ असलेल्या प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे आठ तालुक्यात आठ मतदार संघात आठ जागांसाठी निवडणूक आहे.

- Advertisement -

तसेच महिला प्रतिनीधी २ जागा, अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमातीतील सदस्य १ जागा, इतर मागास वर्गातील सदस्य १ जागा, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विषेश मागास संवर्गातील सदस्य १ जागा, संलग्न नागरी सहकारी बँक, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या सहकारी संस्था मतदार संघ सदस्य १ जागा, संलग्न सहकारी पणन संस्था,शेतीप्रकिया सस्था ग्राहक सहकारी संस्था मतदार संघ १ जागा,संलग्न अद्योगिक संस्था, मजूर संस्था, जगल कामगार संस्था, मोटार वाहतूक संस्था मतदार संघ १ जागा, संलग्न मच्छिमार संस्था, सर्व दुग्ध संस्था, कुक्कुटपालन, वाराहपालन, जनावरे पैदास करणाऱ्या मतदार संघ १ जागा, संलग्न विणकर संस्था, घरबांधणी संस्था आणि इतर सर्व संस्था मतदार संघ १ जागा आणि इतर कायद्याखाली नोंदविलेल्या सभासद संस्था, सभासद झालेल्या सर्व बिगर सहकारी झालेल्या सर्व बिगर सहकारी संस्था अंतर्भूत असतील अशा संस्था व व्यक्ती सभासद मतदार संघ १ जागा अशा एकूण १९ जागांसाठी निवडणूक होणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -