घरदेश-विदेशलाल दिव्यांपाठोपाठ आता वाहनांचे सायरनही होणार बंद, वाचा काय आहे कारण..

लाल दिव्यांपाठोपाठ आता वाहनांचे सायरनही होणार बंद, वाचा काय आहे कारण..

Subscribe

लवकरच कायदा करणार असल्याची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली माहिती

वाहनांच्या कर्णकर्कश्य हॉर्नचा आवाज बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आता अॅम्ब्युलन्ससह इतर वाहनांवरील सायरन लवकरच बंद करणार असल्याची घोषणा नाशिकमध्ये केली. आगामी काळात सायरनऐवजी आकाशवाणीवर वाजणारी धून ऐकू येईल, असंही त्यांनी सांगितलं.

नाशिकमध्ये आयोजित विविध प्रकल्पांच्या लोकार्पण आणि कोनशिला अनावरण सोहळ्याप्रसंगी गडकरी बोलत होते. नागपूरात मेट्रोमुळे प्रवास जलदगतीने होत असला तरीही, त्याच्या आवाजाने नागरिकांना त्रास होत होता. त्यामुळे साउण्ड बॅरिअर्स लावण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र, कधी अॅम्ब्युलन्स तर कधी सरकारी वाहनांच्या ताफ्यांकडून वाजवला जाणारा सायरनच्या आवाजाचा प्रश्न कायम आहे. त्यावरही आम्ही अभ्यास करतोय. कधीकाळी आकाशवाणीची पहाटे वाजणारी धून खूप प्रसिद्ध होती. अशी धून सायरनऐवजी वाजल्यास सर्वांना सुसह्य असेल. कारण, मोठ्या आवाजांचा कानांवर आणि आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. त्यामुळे सायरनसंदर्भात लवकरच कायदा होईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, वाहनांचे हॉर्न आता भारतीय वाद्यांच्या स्वरुपात वाजणार असल्याचा कायदा आपण केला आहे. त्यामुळे लवकच बासरी, तबला, माऊथ ऑर्गन असे सुमधून हॉर्न ऐकू येतील, असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -