घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनोटबंदीला सहा वर्षे, राष्ट्रवादीकडून श्रध्दांजली

नोटबंदीला सहा वर्षे, राष्ट्रवादीकडून श्रध्दांजली

Subscribe

नाशिक : शहर राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी (दि.8) नोटबंदीच्या निषेधार्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी भवन येथे करण्यात आलेल्या या आंदोलनात नोटबंदीला श्रध्दांजली वाहत या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला.
2016 मध्ये पंतप्रधानांनी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. परंतु, या नोटबंदीच्या निर्णयाचा सर्वत्र विसर पडलेला दिसतो. भाजपसुद्धा या निर्णयावर मौन बाळगून असून, जनतेने हा निर्णय विसरावा, असे प्रयत्न सतत होत असतात.

नोटबंदी स्वातंत्र्योत्तर भारताच्या इतिहासातील एक मोठी घोडचूक होती. या निर्णयाने भारताची अर्थव्यवस्था अपंग झाली असून अर्थव्यवस्थेचा कणा या निर्णयामुळे मोडला. काळ्या पैशावर कारवाई, बनावट नोटा चलनातून हद्दपार करणे, दहशतवादी व नक्षलवाद्यांच्या कारवाया रोखणे व कॅशलेस व्यवहार करणे हा यामागील उद्देश होते. परंतु, कॅशलेस व्यवहार वगळता अन्य एकही मुद्दा यशस्वी झालेला नाही. यापुढील काळातही केंद्र सरकार कॅशलेस व्यवहारावर कर लावण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. नोटबंदीने जुन्या नोटा जमा करण्यासाठी आणि नवीन नोटा घेण्यासाठी संपूर्ण देशाला रांगेत उभे करून अनेकांचा बळी घेतला. नोटबंदीनंतर जवळपास ९९ टक्के नोटा परत आल्या. यामुळे काळापैसा गेला कुठे असा सवाल जनतेत आहे. नोटाबंदीचा सर्वात मोठा परिणाम लघुउद्योगांवर झाला.

- Advertisement -

नोटबंदीपूर्वी बहुतांश उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होत होते. नोटाबंदीच्या काळात या उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होणे बंद झाले, रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांचे उद्योग ठ्प्प झाले. दहशतवादी व नक्षलवाद्यांच्या कारवाया अजूनही सुरुच असून त्यांच्या माध्यमातून बनावट चलनी नोटा बाजारपेठात आल्या आहेत. एकंदरीत सर्व प्रकरण बघता रांगेत बलिदान दिलेले नागरिक, अर्थव्यवस्था खिळखिळी झाल्याने कर्जात बुडालेली जनता व लघु उद्योग बंद पडल्याने आत्महत्या करणारे मजूर यांना श्रद्धांजली वाहण्यात आल्याचे युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सांगितले यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, नाना महाले, अर्जुन टिळे, बालम पटेल, विष्णूपंत म्हैसधुणे, निवृत्ती अरिंगळे, अनिता भामरे, संजय खैरनार, धनंजय निकाळे, राजाराम धनवटे, साजिद मुलतानी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -