घरमहाराष्ट्रआता मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांत सभा होणार, राज ठाकरेंचा एल्गार

आता मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांत सभा होणार, राज ठाकरेंचा एल्गार

Subscribe

मुंबईला गुढीपाडव्याला सभा घेतली त्यानंतर बरेच जण बडबडायला लागले, त्याला उत्तर देण्यासाठी ठाण्यात उत्तर सभा घेतली. खरं तर दोनच सभा घेतल्या पण या दोन सभांवरती किती बोलतायत, असं म्हणत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल चढवला.

औरंगाबादः ठाण्याची सभा झाल्यानंतर दिलीप धोत्रेंनी फोन केला, साहेब आपण संभाजीनगरलाही सभा घेऊ या. संभाजीनगर हा तर महाराष्ट्राचा मध्य भाग, मी त्याला सांगितलं संभाजी नगरला सभा घेऊ तारीख नंतर सांगतो. हा विषय फक्त संभाजीनगरपुरातच नाही. तर माझ्या आता सभा मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांत होणार आहेत. विदर्भात, कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे. सभांना आडकाठी आणून काहीच फायदा नसल्याचंही राज ठाकरेंनी अधोरेखित केलंय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी औरंगाबादमध्ये आज सभा घेतली, त्यावेळी सभा घेण्यास विरोध करणाऱ्यांना खडे बोल सुनावले.

खरं तर सभा होणार की नाही होणार, राज ठाकरेंनी सभा घ्यावी की न घ्यावी, सभेला परवानगी मिळणार की नाही मिळणार, खरं तर ही गोष्ट का केली मला अजूनपर्यंत समजलेलं नाही. महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात सभा घेतली असती तरी दूरदर्शनवरून पाहिलीच असती ना. मुंबईला गुढीपाडव्याला सभा घेतली त्यानंतर बरेच जण बडबडायला लागले, त्याला उत्तर देण्यासाठी ठाण्यात उत्तर सभा घेतली. खरं तर दोनच सभा घेतल्या पण या दोन सभांवरती किती बोलतायत, असं म्हणत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल चढवला.

- Advertisement -

माझी सभा टीव्हीवर पाहता आणि ऐकता येणार नाही. कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा राहत नाही. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. संभाजीनगरमध्ये 10 दिवसांनी पिण्याचं पाणी येतं. सगळेच प्रश्न प्रलंबित आहेत. मला याची संपूर्ण कल्पना आहे. मी प्रमुख विषयांना धरून आज बोलणार आहे. या संभाजीनगरचं मूळ नाव खडकी, आपल्या दोन्ही राजधान्या इथल्यात आहेत. एक आमचा देवगिरीचा किल्ला आणि त्याच्या आधीची आमची पैठण, मला वाटतं महाराष्ट्र दिन साजरा करताना महाराष्ट्र समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्र समजला पाहिजे. जो जो समाज इतिहास विसरला त्याच्या पायाखलाचा भूगोल सटकलेला आहे. त्यामुळेच आपण इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. आपण महाराष्ट्राचे आहोत, मराठी आहोत. या महाराष्ट्रानं देशाला काय काय दिलं. हा देश नव्हता तर ही भूमी होती. ज्ञानेश्वर गेल्यानंतर अल्लाहुद्दिन खिलजी इथे आला आणि आमच्या देवगिरीच्या किल्ल्यात शिरल्याचंही राज ठाकरेंनी सांगितलंय.


हेही वाचाः काही लोकांना असं वाटत ते म्हणजेच महाराष्ट्र आहे- देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला टोला

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -