घरमहाराष्ट्रसोलापुरात घडलं काय? सुशीलकुमार शिंदे का हरले? वाचा ही ३ कारणं!

सोलापुरात घडलं काय? सुशीलकुमार शिंदे का हरले? वाचा ही ३ कारणं!

Subscribe

काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला भाजपच्या गोटातून खेचून आणण्याच्या तयारीत असलेल्या सुशीलकुमार शिंदेंना मोठा धक्का बसला असून सोलापुरात काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

२०१४मध्ये मोदी लाटेमध्ये विरोधक वाहून गेले असं म्हटलं गेलं. पण २०१९मध्ये मोदींच्या त्सुनामीमध्ये विरोधकांना उद्ध्वस्त करून ठेवलं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. त्याच त्सुनामीमध्ये महाराष्ट्रातले काँग्रेसच्या जवळपास सगळ्याच शिलेदारांचं पानीपत झालं. त्यातलंच एक मोठं नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे. अर्थात, गेल्या निवडणुकीत देखील सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झालाच होता. मात्र, तेव्हा मोदी लाटेमध्ये शरद बनसोडे निवडून आले असावेत असं म्हटलं गेलं. पण यंदा मात्र निवृत्तीआधीची शेवटची निवडणूक असावी म्हणून सुशील कुमार शिंदेंसोबतच त्यांचे कार्यकर्ते आणि काँग्रेसनेही या जागेवरची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण त्यांचे सर्व मनसुबे उधळले गेले. त्यामुळे कदाचित त्यांची शेवटची लोकसभा निवडणूक ठरलेल्या या निवडणुकीत देखील त्यांना विजय मिळवता आलेला नाही. नक्की काय घडलं सोलापूरमध्ये?


काय आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातली राजकीय गणितं? वाचा!

का हरले सुशीलकुमार शिंदे?

१) प्रकाश आंबेडकर – सुशीलकुमार शिंदेंच्या पराभवाचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडर. जयसिद्धेश्वर स्वामी सुरुवातीपासूनच लिंगायत समाजाची एकगठ्ठा मतं आणि हिंदू वोटबँकेवर अवलंबून होते. पण सुशीलकुमार शिंदेंना मात्र काँग्रेसचा बालेकिल्ला, पारंपरिक मतदार, आघाडीकडे असलेले ४ विधानसभा मतदारसंघ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दलित समाजाची मतं यावर भिस्त ठेऊन होते. पण ऐन वेळी प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारी जाहीर केली आणि शिंदेंच्या आडाख्यांना सुरुंग लागला. या तिघांना मिळालेली मतं पाहिली तर सिद्धेश्वर स्वामींना ५ लाख २४ हजार ९८५, सुशीलकुमार शिंदेंना ३ लाख ६६ हजार ३७७ तर प्रकाश आंबेडकरांना १ लाख ७० हजार ७ मतं मिळाली आहेत. जिथे शिंदे १ लाख ५८ हजार मतांनी पराभव झालेला असताना प्रकाश आंबेडकरांनी मात्र १ लाख ७० हजार मतं घेतली आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या दलित मतांमुळेच सुशीलकुमार शिंदेंचा पराभव झाला, असं म्हणता येईल.

- Advertisement -

२) फक्त मोहोळ पाठिशी – सोलापूरातल्या ६ विधानसभा मतदारसंघांपैकी मोहोळचा मतदारवर्ग पाठिशी उभा राहील ही शिंदेंना खात्री होती. पण निकालांमध्ये फक्त मोहोळचाच मतदार शिंदेंच्या पाठिशी उभा राहिल्याचं दिसून आलं. त्याशिवाय प्रणिती शिंदेंच्या सोलापूर शहर मध्य आणि सिद्धराम म्हेत्रे यांच्या अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातूनही काही प्रमाणात मतदान शिंदेंच्या बाजूनं झालं. पण उर्वरीत पंढरपूर, सोलापूर दक्षिण आणि सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून त्यांना अत्यल्प प्रमाणात मतदान झालं.

३) निवृत्तीचे वेध – खरंतर उमेदवारी जाहीर झाल्यापासून सुशीलकुमार शिंदेंनी सगळी ताकद, प्रतिष्ठा या जागेसाठी पणाला लावली होती. पण त्याआधी २०१४च्या निवडणुकांनंतरच सुशीलकुमार शिंदे बहुधा ‘रिटायरमेंट मोड’मध्ये गेले होते. त्यामुळे त्यानंतर जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी, मतदारांशी किंवा पक्षीय संघटनेशी त्यांचा संपर्क कमी झाला होता. त्यामुळे मतदारवर्ग आपोआपच दुसऱ्या पर्यायाकडे वळला होता. त्याचा फटका देखील शिंदेंना बसला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -