घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रयंदाच्या श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी विशेष व्यवस्था; 'या' असतील सुविधा

यंदाच्या श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी विशेष व्यवस्था; ‘या’ असतील सुविधा

Subscribe

नाशिक : श्रावण महिन्यात भाविकांच्या होणार्‍या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले आहे. श्रावणात भाविकांना मंदिराच्या पूर्व दरवाज्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी वातानुकूलित दर्शनबारीची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे हजारो भाविक दर्शन रांगेत उभे राहून दर्शन घेऊ शकतील. तसेच दर्शन रांगेत ज्येष्ठांना बसण्याची व्यवस्था, स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, पिण्याचे पाणी तसेच प्राथमिक आरोग्य कक्ष, अशा सुविधा करण्यात आल्या आहेत.

श्रावण महिन्यात मंदिर उघडण्याची वेळ पहाटे पाच असून रात्री नऊ वाजता मंदिर बंद होईल. प्रत्येक श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांना दर्शनासाठी पहाटे चार ते नऊ या कालावधीत खुले राहील. गावकर्‍यांना दर्शन वेळ मंदिर उघडल्यापासून सकाळी साडेदहा वाजेपर्यंत आणि सायंकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत राहणार आहे. दर्शनासाठी स्थानिकांकडे रहिवासी असल्याचा पुरावा आवश्यक आहे. दर्शनासाठी गावकर्‍यांना मंदिराच्या उत्तर दरवाजा म्हणजे जाळी दरवाजाने प्रवेश दिला जाईल. धर्मदर्शन रांग पूर्व दरवाजा आणि देणगी दर्शन रांग उत्तर दरवाजा या बाजूने राहणार आहे.

- Advertisement -

श्रावणात विशेषत: सोमवारी भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता एस. टी. महामंडळाच्या वतीने जादा बसेसचे नियोजन केले असून, फेर्‍या वाढविताना त्र्यंबकेश्वरसह जिल्ह्यातील अन्य प्रसिद्ध शिवमंदिरांमध्ये होणारी गर्दी पाहता जादा गाड्या सोडण्यात येतील. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्तांचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.

सुरक्षिततेसाठी भाविकांनी आवाहन

  • आपल्यासोबत कमीत कमी सामान आणावे
  • यात्रेकरुंनी आपल्यासोबत मौल्यवान चीज वस्तू आणू नयेत
  • सुरक्षेच्या दृष्टीने मंंदिरात भाविकांना बॅग व पिशव्या इ. नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
  • यात्रेत कोणतीही बेवारस अगर संशयित वस्तू आढळून आल्यास त्याला स्पर्श न करता त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे
  • कोणतीही व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे दिसल्यात याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी
    भाविकांनी आपली वाहने पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत
  • यात्रेत कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कुणी मुद्दाम अफवा पसरवत असल्यास पोलिसांना तात्काळ तसे कळवावे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -