घरमहाराष्ट्रमालेगाव येथे एसटीला भीषण आग

मालेगाव येथे एसटीला भीषण आग

Subscribe

मालेगाव येथील दोन एसटींना आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मालेगाव येथील एसटी स्थानकावर उभ्या असलेल्या दोन एसटींना भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी देखील एसटी मात्र जळून खाक झाली आहे. मालेगाव येथे बांधण्यात आलेल्या नवीन एसटी बस स्थानकावर ही घटना घडली आहे. या एसटी स्थानकात एकाल एसटीला आग लागली. ही आग अचानक भडकल्यामुळे त्याच्या बाजूला उभी असलेल्या दुसऱ्या एसटीला ही आग लागली आणि ती देखील त्यामध्ये जळून खाक झाली.

नेमके काय घडले?

मालेगाव शहरातील नवीन एसटी बस स्थानकात अचानक एसटीने पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. या एसटीने पेट घेतल्यामुळे ही आग पसरुन त्याच्या शेजारी असलेल्या दुसऱ्या एसटीने देखील पेट घेऊन त्या एसटीची देखील खाक झाली. एकाच वेळी दोन एसटीने अचानक पेट घेतल्याचे पाहून उपस्थित प्रवाशांची धावपळ सुरु झाली. यातील एक एसटी बस सटाणा आगाराची असून एम.एच.०७ सी ९१६ असा या बसचा नंबर असून दुसरी वैजापूर आगाराची एम.एच.२० बी.एल. २६१९ ही बस होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तो प्रयत्न दोन्ही बस जळून खाक झाल्या होत्या. सुदैवाने दोन्ही बसमध्ये प्रवासी आणि वाहक-चालक नसल्याने जीवितहानी टळली आहे. मात्र आगीचे कारण अस्पष्ट असून आग लागली की लावण्यात आली याबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -