घरताज्या घडामोडीST Workers Strike: खरंतर पोलिसांचं अपयश; दिलीप वळसे पाटलांना अजितदादांचा घरचा आहेर

ST Workers Strike: खरंतर पोलिसांचं अपयश; दिलीप वळसे पाटलांना अजितदादांचा घरचा आहेर

Subscribe

एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक आज दुपारी साडे तीनच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. मुंबईतील शरद पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पलफेक आणि दगडफेक केली. यावरून सध्या राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे पोलिसांचे अपयश असल्याचं म्हणतं गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांना घरचा आहेर दिला आहे. तसंच पोलिसांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थितीत केला आहे.

‘एसटी कर्मचाऱ्यांना मदत करण्याची भूमिका पवारांनी घेतली’

कोल्हापूर पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत बोलत असताना अजित पवार म्हणाले की, ‘अनेकदा एसटीचे संप झाले, त्यामध्ये त्यांना मदत करण्याची भूमिका शरद पवारांनी घेतली. केंद्राच्या बरोबरीने आमच्या महाराष्ट्रातील कामगारांना अधिकार मिळायला पाहिजे, ही भूमिका पवारांनी सांगितली. उद्योगपती आणि कामगारांमध्ये जर कुठं अंतर पडलं, तर ते अंतर दूर करण्याचं काम पवारांनी केलं आणि आताही करतायत. आताचा एसटी संप होऊ नये, यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. आम्ही त्या सगळ्यांना समजवून सांगितलं, तुम्ही महाराष्ट्रातील मुलं आहात, तुम्ही ड्रायव्हर, कंटक्टर असला तरी तुम्ही आमच्या कुटुंबातील भाग आहात.’

- Advertisement -

हेही वाचा – ST workers on silver Oak : शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर हल्ला हे पोलीस गुप्तचर यंत्रणेच अपयश

‘याच्या मागे मास्टरमाईंड कोण आहे?’

‘विलीनीकरणाच्या निर्णयाबाबत कोर्ट जो निर्णय देईल ते आम्ही मान्य करू. समिती नेमली, संप मिटवा, आमच्या मुला-मुलींना शाळेत जायला एसटी नाहीये. गरीब माणसाला कुठंतरी दवाखान्यात जायचं असेल तर एसटी नाहीये. त्यामुळे ती एसटी सुरू झाली पाहिजे. म्हणून कोरोनाच्या काळात करोडो रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून आम्ही एसटी करता दिले. मेहरबानी केली नाही. कारण ती पण आपलीच माणसं आहेत. तसंच सर्वसामान्याच्या प्रवासाकरता एसटीपण तितकीच महत्त्वाची होती. परंतु काही लोकांनी त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मनामध्ये काहीतरी चुकीचे सांगण्याचा प्रयत्न केला. मला एका गोष्टचं कळत नाही की, आपण न्याय व्यवस्थेला दिलेला निकाल मान्य करतो. न्यायालयाने जे काही सांगितलं, ते आमचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ऐकलं. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्र्यांना, बाळासाहेबांना सांगितलं. न्यायालयाने जे सांगितलं ते आपण करू. आम्ही पण ताबडतोब हो म्हणालो. तिथं संपामध्ये बसलेल्यांनी गुलाल उधळला. पेढे वाटले. मग असं काय घडलं? आज पवारांच्या घरापर्यंत ही लोकं आली. कुणी यांना भडकवलं? याच्या मागे मास्टरमाईंड कोण आहे? कशा मुळे हे घडलंय? कोण चिथावणीखोर भाषण देतं?,’ असे सवाल अजित पवारांनी उपस्थित केले.

- Advertisement -

‘आज महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारची घटना का घडतेय?’

पुढे अजित पवार म्हणाले की, ‘नशिबाने ज्या शाहू, फुले आंबेडकरांनी या देशाला आणि राज्याला दिशा देण्याचं काम केलं. समतेचा विचार दिला, सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची शिकवण दिली. या महान नेत्यांचा परिसर, शाहू महाराजांचा परिसर, त्या शाहू महाराजांच्या परिसरात आपण सगळेजण लहानाचे मोठे झालो आहोत. आणि अशा महाराष्ट्रात आज अशाप्रकारच्या घटना घडतायत. याच्यामागे खरंतर पोलिसांचं अपयश आहे. त्याच्याबद्दल आम्ही मुंबईला गेल्यावर सगळी माहिती घेऊ. पण कुणी यांना भडवलं? का आज महाराष्ट्रात वेगळ्या प्रकारची घटना घडतेय? उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे जातोय हे कोणाला का बघवत नाहीये?’


हेही वाचा – Gunratna Sadavarte : शरद पवारांच्या घरावर हल्ला, वकील गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात, अटक होण्याची शक्यता


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -