घरमहाराष्ट्रst workers strike : ३ हजार एसटी कर्मचारी कामावर हजर, अनेक मार्गावरील...

st workers strike : ३ हजार एसटी कर्मचारी कामावर हजर, अनेक मार्गावरील एसटी सेवा सुरु

Subscribe

एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करुन घ्यावे या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी बंदची हाक पुकारली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यातील हजारो एसटी कर्मचारी संप करत आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका एसटी महामंडळाला सहन करावा लागतोय. संपामुळे एसटी महामंडळाचे दरदिवसाला लाखोंच्या घरात नुकसान होतेय. आधीच १२ हजार कोटींच्या संचित तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने आता पोलीस बंदोबस्तात एसटीची सेवा सुरु केली. यात कामगारांना देखील कामावर येण्याचे आवाहन केले जात आहे. एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या (ST employee strike) सुरक्षेची जबाबदारी घेतल्याने शुक्रवारी ३६ आणि शनिवारी ७१ बसेस रस्त्यावर पुन्हा धावल्या आहे. शनिवारी २८ वेगवेगळ्या आगारांमधून या ७१ बस सोडण्यात आल्या असून यातून २ हजार नागरिकांनी प्रवास केला अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.

राज्यभरात एसटीच्या चालक आणि वाहकांची संख्या एकूण ६५ हजार २८० इतकी आहे. शुक्रवारी यातील १४३ कर्मचारी कामावर रुजू झालेत. दरम्यान ३६७५८ चालक तर २७०२३ वाहक असे एकूण ६३ हजार ७८१ एसटी कर्मचारी अद्याप संपात सहभागी आहे. तर त्यापैकीआतापर्यंत एकूण २०५३ एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाविरोधात एसटी महामंडळाने उच्च न्यायालय आणि औद्योगिक न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालय आणि औद्योगीक न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ३४३ कर्मचाऱ्यांवर अवमान याचिका दाखल करण्यात केली आहे. सोमवारी या अवमान याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मात्र सर्वाधिक एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीचे विलीनीकरण होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका घेतली आहे.

- Advertisement -

न्यायलयाने सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांवी कामावर रुजू होण्याचे आवाहन केले मात्र एसटी कर्मचारी संपावर अडून बसले आहेत.अशातच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकारने राज्यातील खाजगी बस संघटनांना राज्यातील विविध बस स्थानकातून बस गाड्या सोडण्यास परवानगी दिली.

एसटी कर्मचाऱ्यांची एकूण संख्या

वर्ग –          एकूण कर्मचारी –      हजर कर्मचारी –      संपात सहभागी कर्मचारी

- Advertisement -

प्रशासकीय –  ९४२६ –                 २२६५                 ६८४९

कार्यशाळा –  १७५६०                  ७५८                  १५९५६

चालक –      ३७२२५                 १११                    ३६७५८

वाहक –       २८०५५                ३२                     २७०२३

एकूण –      ९२२६६                ३१६६                   ८६५८६


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -