घरमहाराष्ट्रदूध उत्पादकांसाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

दूध उत्पादकांसाठी राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

Subscribe

दूध उत्पादकांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. दूध पावडर निर्यात करणार्‍या दूध संघांना प्रति किलो ५० रुपये अनुदान देणार येणार असल्याची घोषणा महादेव जानकरांची विधानसभेत केली आहे.

दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. दूध पावडर निर्यात करणाऱ्या दूध संघांना प्रति किलो ५० रुपयांचे अनुदान देणात येणार आहे. तसंत दूध निर्यात करणाऱ्या दूध प्रकल्पांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान देणात येणार आहे. पशु संवर्धन दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी आज विधानसभेमध्ये ही घोषणा केली आहे.

आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम

महादेव जानकरांनी जरी घोषणा केली असली तरी जोपर्यंत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर ५ रुपये जमा होत नाही. तसंच दूधाचा दर ५ रुपयाने वाढत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. आम्ही आमच्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे देखील त्यांनी माय महानगरशी बोलताना सांगितले आहे.

- Advertisement -

तर मुंबईत दूध येऊ देणार नाही

राज्यातील दूध उत्पादकाला प्रतिलिटर ५ रुपये अनुदान मिळावे आणि ते थेट उत्पादकांच्या नावावर ५ रुपये जमा करावे, अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने येत्या १६ जुलैपासून मुंबईचे दूध बंद करण्याचा इशारा दिला आहे. दूध संकलनासाठी उत्पादकांवर जबरदस्ती केली तर गाठ आमच्याशी आहे! असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -