घरताज्या घडामोडीकचरामुक्त शहरांसाठी राज्यस्तरीय प्रकल्प आराखडा करा

कचरामुक्त शहरांसाठी राज्यस्तरीय प्रकल्प आराखडा करा

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. त्यात त्यांनी राज्य कचरामुख्त होण्यासाठी विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी सूचना दिल्या.

स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये महाराष्ट्रातील शहरे अव्वल येण्यासाठी छोट्या शहरांबरोबरच मोठ्या शहरांनीही एक टीम म्हणून काम करावे. कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनचा राज्याचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिल्या. तसेच शहरे स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रत्येक शहरामध्ये नागरिकांना आनंद देणारी सुंदर उद्याने निर्माण करावीत, असेही त्यांनी सांगितले. स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या अनुषगांने शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महानगरपालिका आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अनिल परब, मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. तर नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी सादरीकरणाद्वारे स्वच्छ महाराष्ट्र अभियानात आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा सादर केला.

शहरे ही देशाचा चेहरा

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील शहरे स्वच्छतेत अग्रेसर राहण्यासाठी सर्वच जण चांगले काम करत आहेत. मात्र, सर्वेक्षणात राज्यातील जास्तीत जास्त शहरांना पहिल्या दहामध्ये मानांकन मिळण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. त्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याने सामान्य नागरिक म्हणून आपल्या शहरांकडे पाहणे आवश्यक आहे. त्यातून नागरिकांना काय हवे हे कळण्यास मदत होते. शहरे ही देशाचा चेहरा असल्यामुळे येथील रस्ते, पदपथ, मैदाने, रुग्णालये स्वच्छ आणि सुंदर राहावीत, यासाठी प्रयत्न व्हावेत. रस्त्यांवरुन चालताना नागरिकांना आनंददायी वाटावे, आपली शहरे पाहण्यासाठी परदेशी पर्यटक यावेत, अशी ती असावीत. त्यासाठी कामांचे प्राधान्यक्रम ठरविण्यात यावे. तर राज्यातील कचरामुक्तीसाठी राज्यस्तरीय एकत्रित आराखडा तयार करावा. यामध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्प, या प्रकल्पाच्या ठिकाणी हरित पट्टा, कचरा विलगीकरण आदींचा समावेश असावा. तसेच ओला आणि सुका कचरा शंभर टक्के वेगळा करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. बृहन्मुंबई, नाशिक, नवी मुंबई, औरंगाबाद या महापालिकाच्या आयुक्तांनी तसेच लोणावळा आणि कराड नगरपालिकाच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वच्छ सर्वेक्षणात होत असलेल्या प्रगतीची माहिती दिली.

- Advertisement -

हेही वाचा – ‘यंत्रणेने शेतकऱ्यांना आपुलकीची वागणूक देऊन कर्जमुक्तीचा लाभ द्यावा’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -