सांगलीची रणरागिणी उपजिल्हाधिकारी! हल्लेखोरांवर केला जोरदार प्रतिहल्ला

मार्शल आर्ट असलेल्या हर्षलता गेडाम यांनी हल्लेखोरांवर प्रतिहल्ला केल्याने हल्लेखोरांनी घटनास्थळावर धूम ठोकली.

सांगलीच्या उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांच्यावर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, मार्शल आर्ट असलेल्या हर्षलता गेडाम यांनी हल्लेखोरांवर प्रतिहल्ला केल्याने हल्लेखोरांनी घटनास्थळावर धूम ठोकली. याप्रकरणी हेमलता गेडाम यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Strong counter-attack on the attackers by sangli’s deputy collector)

हर्षलता गेडाम या नियमित जॉगिंगला जातात. हल्लेखोरांनी त्यांना जॉगिंग करत असतानाच गाठलं. मोटारसायकवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गेडाम यांच्यावर हाताला पकडलं. हाताला पकडताच गेडाम यांनी लाथ मारून हल्लेखोरांना खाली पाडले. या झटापटीवेळी दुसऱ्या आरोपीने गेडाम यांच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात गेडाम या किरकोळ जखमी झाल्या आहेत. गेडाम यांनी जोरदार प्रतिहल्ला केल्याने हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले.

माहितीनुसार, या दोन हल्लेखोरांनी याआधीही १७ मे रोजी गेडाम यांचा पाठलाग केला होता. तसेच, त्यांची छेडछाडही केली होती. त्याच व्यक्तींनी पुन्हा त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याबाबत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये विरोधात गुन्हा दाखल केला आहे.