घरमहाराष्ट्रनाशिकम्युनसिपल सेनेवरील वर्चस्वासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटात संघर्ष

म्युनसिपल सेनेवरील वर्चस्वासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटात संघर्ष

Subscribe

नाशिक : राज्यात शिवसेनेत सरळ दोन गट पडलेले असताना आता त्याचेच प्रतिबिंब नाशिक महानगर पालिकेतील शिवसेना पुरस्कृत मनपा कर्मचारी-कामगार सेनेतही उमटत आहे. मनपा कर्मचारी-कामगार सेनेचे विद्यमान अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आता शिवसेना व शिंदे गट यांच्यात या संघटनेवरील वर्चस्वावरुण सघर्ष उभा राहिला आहे. संघटनेचे संस्थापक माजी मंत्री बबनराव घोलप यांनी तिदमे यांची हकालपट्टी केल्याच जाहीर केल आहे. मात्र प्रवीण तिदमे यांनी मीच कायदेशीर अध्यक्ष असल्याच म्हंटल्याने आता यात कायदेशीर पेच निर्माण होऊन हा संघर्ष न्यायालयात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान मंगळवारी (दी. २७) संघटनेचे संस्थापक बबनराव घोलप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सुधाकर बडगुजर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यात सत्तासंघर्ष निर्माण होऊन मूळ शिवसेना कोणाची हा वाद थेट न्यायालयात पोहचला तसच काहीसं आता नाशिक महानगर पालिकेतील कामगार कर्मचारी सेना या संघटनेबाबत घडतांना दिसत आहे. २०१७ मध्ये माजी नगरसेवक प्रवीण तिदमे यांची या संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र राज्यात मागील काही महिन्यात अनेक घडामोडी घडल्या आणि एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांच्या साथीने बंड करत भाजपाच्या पाठिंब्याने सत्तांतर केल. नाशिक मधूनही आमदार दादा भुसे, सुहास कांदे यांच्या पाठोपाठ खासदार हेमंत गोडसे यांनीही शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ नाशिक महानगर पालिकेतील माजी नगरसेवकांपैकी प्रथम बंड करत प्रवीण तिदमे यांनीही शिंदे यांच्या गटात निर्णय घेतला. शिंदे गटात प्रवेश करताच त्यांच्यावर महानगरप्रमुख पदाचीही जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती. मात्र यानंतर शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी तात्काळ डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सातपुर येथे सर्व पदाधिकारी शिवसैनिकांची मिसळ पार्टीचे आयोजन केल. त्याच मिसळ पार्टीत संघटनेचे संस्थापक बबनराव घोलप यांनी तिदमे यांची अध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्याचा आणि त्याजागी महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करत असल्याचा निर्णय जाहीर केला. त्याच अनुषंगाने मंगळवारी (दी.२७) शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात सर्वसाधारण सभा घेत ठरावाद्वारे बडगुजर यांची निवड करण्यात आली. मात्र ही सर्वसाधारण सभाच मुळात बेकायदा असल्याचा सांगत मीच अध्यक्ष असल्याचा दावा प्रवीण तिदमे यांनी केला आहे. यामुळे आता राज्यातील सत्तसंघर्षा प्रमाणे नाशिक महानगर पालिकेतील म्युनसिपल कर्मचारी कामगार सेनेवरील वर्चस्वाचा वादही आता न्यायालयात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisement -
पालिका मुख्यालयाला छावणीचे स्वरूप

सुधाकर बडगुजर यांची म्युनसिपल कर्मचारी सेनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यासाठी नाशिक महानगर पालिका मुख्यालयात सर्वसाधारण सभेच आयोजन करण्यात आल होत. त्याच वेळी विद्यमान अध्यक्ष, शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे हेही आपल्या समर्थकांसोबत महानगर पालिका मुख्यालयात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यातून संघर्ष उभा राहू शकत असल्याने पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त पालिका मुख्यालयत तैनात केला होता. मुख्यालयत येणार प्रत्येक वाहन तपासून आत सोडल जात होत. मात्र पोलिस आयुक्तांनी पालिका मुख्यालयात सर्वसाधारण सभा घ्यायलाच परवानगी नाकारली. त्यानंतर ही सभा शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यलयात पार पडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -