घरपालघरसण, उत्सव येऊन जाताहेत, खड्डे मात्र तसेच

सण, उत्सव येऊन जाताहेत, खड्डे मात्र तसेच

Subscribe

यापेक्षा जास्त शहरवासीयांना नगर परिषदेकडून काहीच नको. मात्र खेदाची बाब आहे की, जव्हार नगर परिषद या दोन्ही बाबतीत सपशेल फोल ठरत आहे. रस्त्यांचे हाल बघूनही नगर परिषद काहीच करीत नाही, याचाच रोष शहरवासीयांत खदखदत आहे.

जव्हार : जव्हार शहरात लाडक्या गणरायाला मोठ्या भक्ती भावाने पूजन आणि अर्चना करत निरोप दिला, त्यावेळी देखील जव्हार नगर परिषदेने खड्डे बुजविले नाहीत. आता पवित्र अशा दुर्गा मातेची स्थापना आजपासून शहरासह तालुक्यातील बर्‍याच ठिकाणी होत आहे. शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नवरात्री उत्सवाला खड्ड्यांचे विघ्न जाणवत आहे. शहरातील बहुतांश रस्त्यांची चाळण झाली आहे. शहरातील बर्‍याच रस्त्यांवर वाहन चालविणे तर सोडाच पण चालताना देखील मोठी कसरत करावी लागत आहे. मात्र,शहरातील नगर परिषदेकडून रस्त्यांची दुरुस्ती होत नाही. उखडलेल्या रस्त्यांवरून गणरायाची मिरवणूक पार पडली, नवरात्रोत्सव सुरू होत असून, दुर्गा भक्तांना गरब्याला जाताना रात्रीच्या अंधारात याच रस्त्यांवरून प्रवास करावा लागणार आहे. शहरवासीयांना नगर परिषदेकडून फक्त दैनंदिन स्वच्छता व रस्ते आणि पिण्या योग्य स्वच्छ व पुरेसे पाणी एवढ्याच गोष्टींची अपेक्षा असते. यापेक्षा जास्त शहरवासीयांना नगर परिषदेकडून काहीच नको. मात्र खेदाची बाब आहे की, जव्हार नगर परिषद या दोन्ही बाबतीत सपशेल फोल ठरत आहे. रस्त्यांचे हाल बघूनही नगर परिषद काहीच करीत नाही, याचाच रोष शहरवासीयांत खदखदत आहे.

जव्हार शहरातील सर्वच रस्त्यांची खड्डे पडल्याने चाळण झाली आहे. परिणामी नागरिकांना वाहन चालविणे तर सोडाच साधे चालणेही जीवावर येऊ लागले आहे. परिणामी माणसाला तर सोडाच दुर्गा मातेलाही याच रस्त्यांनी झटके खात यावे लागणार आहे.
– राजु पाडवी, सामाजिक कार्यकर्ते,जव्हार

- Advertisement -

जव्हार शहरात पावसामुळे रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, शहरातील नवरात्रीची धूम विशेष असते,त्या अनुषंगाने जव्हार नगर परिषद प्रशासनाला रस्त्याला पडलेले खड्डे बुजवण्याचे सूचना दिल्या आहेत.
– विशाखा अहिरे,नगर सेविका,जव्हार नगर परिषद

गणेशोत्सव व नवरात्र आला म्हणजे नगर परिषदेकडून विटा किंवा दगड मातीचा भराव टाकण्याचे सौजन्य दाखविले जाते. मात्र, यामुळे नागरिकांच्या त्रासात जास्तीची भर पडते आणि खड्डे बुजविल्याचा आव आणत नगर परिषदेकडून हात वर केले जातात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -