घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनामांकित कॉलेजमधील विद्यार्थी करत होते मौजमजेसाठी मोबाईल चोरी

नामांकित कॉलेजमधील विद्यार्थी करत होते मौजमजेसाठी मोबाईल चोरी

Subscribe

नाशिक : नाशिक शहरातील जुना गंगापूर नाका परिसरातील मॅग्ग्नम हॉस्पिटल समोरील रस्त्यावर मोबाईल चोरीची घटना घडली होती. त्या मोबाईल चोरीच्या घटनेतील गुन्हेगारांचा शोध नाशिक गुन्हे शाखा घेत असतानाच त्यांना गुन्हेगार मिळून आलाय. या चोरीच्या घटनेत एक धक्कादायक वास्तव समोर आल आहे. या मोबाईल चोरीच्या घटनेमध्ये नाशिक शहरातील नामवंत कॉलेज मधील युवकांचा समावेश असल्याचं समोर आला आहे. शहरातील केटीएचएम व व्हीएन नाईक कॉलेज मधील चार विद्यार्थ्यांच्या टोळीला पोलीसांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्याने तसेच त्यांच्याकडून इतर २२ मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये अधिकच धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत हे चारही कॉलेज वाईन युवक मौजमजेसाठी मागील अनेक महिन्यापासून मोबाईलची चोरी करत होते. पोलीस तपासात तब्बल २२ मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा उलघडा झाला आहे. चौघांकडून आत्तापर्यंत साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

- Advertisement -

खरंतर, चांगल्या घरातील असलेल्या या मुलांना मौजमजेसाठी घरून मिळणारे पैसे अपुरे पडत असल्याने त्यांनी सोप्प्या मार्गाने पैसा कामावण्यासाठी मोबाईल चोरी करण्याचे काम केले. यात त्यांनी अनेक महागडे मोबाईल चोरी केले आहेत. या विद्यार्थ्यांकडे त्यांना घरून मिळणाऱ्या पैश्या पेक्षा अधिक रकमेच्या अनेक चैनीच्या वस्तू होत्या तरी त्यांच्या कुटुंबियांनी त्याबाबत त्यांना कधीच विचारणा केली नाही. यामुळे त्यांचे चोरी करण्याचे धाडस अधिक वाढीस लागल्याचे तपासात समोर आले आहे.

खरतर, आपल्या मुलांकडे आपण त्यांना देत असलेल्या पैशाच्या व्यतिरिक्त महागड्या वस्तू कशा येतात. आपली मुलं एशो आरामाचे जीवन कसे जगतायेत? याकडे पूर्णतः पालकांचे दुर्लक्ष झाल्याने त्या मुलांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत वाढ झाल्याचं धक्कादायक वास्तव आज समोर येताना दिसतय. मागील वर्षभरामध्ये घडलेल्या एकूण गुन्हेगारीच्या घटनांमध्ये अल्पवयीन व कॉलेजवयीन मुलांची संख्या ही मोठी असल्याचे धक्कादायक वास्तव नुकतंच समोर आलं होतं. यासाठी आजूबाजूचं वातावरण जितकं जबाबदार आहे, तितकच पालकांनी मुलांकडे केलेला दुर्लक्ष हे देखील मोठं कारण असल्याचं मत जाणकारांनी व्यक्त केल आहे. अशा पद्धतीने नामांकित कॉलेजमध्ये शिकणारे आणि चांगल्या घरातली मुलं चोरीच्या गुन्ह्यामध्ये सापडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे व ही घटना पालकांची चिंता वाढवणारी देखील आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -