घरताज्या घडामोडीभास्करराव बोलू नका, अनिल देशमुख बोलूनच जेलमध्ये चालले - सुधीर मुनगंटीवार

भास्करराव बोलू नका, अनिल देशमुख बोलूनच जेलमध्ये चालले – सुधीर मुनगंटीवार

Subscribe

संसदीय आयुध गोठवण्याचे काम कोणत्याही विधानसभेने केले नाही असा मुद्दा विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या कामकाजाच्या सुरूवातीलाच उपस्थित केला. सरकारने सरसकट आयुध गोठवून टाकले, आपण ६१ व्या वर्षी मागे चाललोय की पुढे चाललोय असेही फडणवीस यावेळी म्हणाले. बीएससीला आयुध गोठवण्याचा अधिकार नाही, लोकशाहीला कुलूप लावण्याचा हा प्रकार आहे. व्यपगत केलेले प्रश्न अतारांकित करावेत आणि आयुध वापरण्याचा अधिकार द्यावा अशीही विनंती त्यांनी सभागृहात केली. त्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाराच्या मुद्द्यावर बोलताना भास्कर जाधव आणि मुनगंटीवार यांच्यात खटके उडाले. मुनगंटीवार यांनी बोलताना सांगितले की मधे बोलल्यानेच अनिल देशमुख जेलमध्ये चालले आहेत. जेलचा उल्लेख केल्यामुळे विधानसभेत गोंधळ पहायला मिळाला. नाना पटोले यांनी जेलमध्ये पाठवण्याची धमकी देता का ? असाही सवाल यावेळी केला.

अनिल देशमुख यांना जेलमध्ये पाठवण्याची धमकी देता का ? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. त्यानंतर नवाब मलिक यांनी हा मुद्दा रेकॉर्डवरून काढून टाका असे सुचवले. त्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी भास्कर जाधव यांना डिवचत म्हटले होते की, भास्कर जाधव खूपच अस्वस्थ आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्यांना महत्वाचे पद द्यावे किंवा एखादे मंत्रीपद द्यावे. त्यानंतर बोलताना मुनगंटीवार यांनी सांगितले की सरकारची चमचेगिरी भास्कर जाधव यांनी करू नये. मधे बोलू नये नाही तर अनिल देशमुख यांच्यासारखे जेलमध्ये जावे लागेल असा चिमटा मुनगंटीवार यांनी लगावला. त्यावर नाना पटोले यांनी हरकत घेत धमकी देत आहात का ? असा सवाल यावेळी केला. या मुद्यावर भास्कर जाधव यांनीही मला संरक्षण मिळावे. भाजपकडून सगळ्या यंत्रणा वापरून घाबरवण्याचा प्रकार सुरू आहे. ईडी, एनआयए, सीबीआय यासारख्या अनेक यंत्रणांचा वापर करत भाजपकडून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळेच मला या प्रकरणात संरक्षण द्यावे अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.

- Advertisement -

फडणवीसांची टीका

सरकारने आजच्या कामकाजात विधेयके दाखवली. आजच विधेयक दाखवाये, आजच पास करायचे असाच प्रकार सुरू आहे. आधी विधेयक का पोहचवल नाही, कॅबिनेट मान्यतेनंतर देता आले असते असेही फडणवीस म्हणाले. रात्री दहा वाजेपर्यंत कार्यक्रमपत्रिका देत नाही, ही काय लपवालपवी आहे असाही सवाल त्यांनी केला. चर्चेत भाग घेऊ देत नसाल, तर आम्ही चर्चा करणार नाही. मुस्कटदाबी, रेटून नेऊन कारभार करणे योग्य नाही असेही फडणवीस म्हणाले. लोकशाहीला डब्बाबंद करण्याचा प्रकार सुरू असल्याचे ते म्हणाले. फडणवीस यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर प्रश्न अतारांकित केले जातील आणि आमदारांच्या प्रश्नाला उत्तरे दिली जातील असे उत्तर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांच्याकडून देण्यात आले.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -