घरताज्या घडामोडीकोरोना निर्बंधांचा व्यापारी वर्गाला आर्थिक फटका, ४ लाख व्यापारी संकटात

कोरोना निर्बंधांचा व्यापारी वर्गाला आर्थिक फटका, ४ लाख व्यापारी संकटात

Subscribe

मुंबई महानगर क्षेत्रात जवळपास ४ लाख व्यापारी असून त्यातील अडीच लाख व्यापारी किरकोळ क्षेत्रातील

राज्यात कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी त्याचा फटका अद्याप व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्यांना भोगावा लागत आहे. कोरोना काळात लादलेल्या निर्बंधांमुळे व्यापारी वर्गाला मोठा फटका सहन करावा लागला आहे. राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणताना दुकानांच्या निर्बंधांमुळे मुंबईसह अनेक भागात व्यापारांमध्ये नाराजी दिसून आली. कोरोनाच्या काळात मागील दीड वर्ष व्यापारी वर्गाला मोठा फटका बसलेले असताना त्यांनी मोठ्या हिंमतीने पुन्हा व्यवसाय सुरु केला मात्र दुकाने सुरु ठेवण्याच्या वेळांनी व्यापारांचे कंबरडे मोडले. कोरोनाच्या या निर्बंधांमुळे ४ लाखांहून अधिक व्यापारी वर्ग संकटात आला आहे. (Corona restriction hit the business community, leaving 4 lakh traders in crisis)

मुंबई महानगर क्षेत्रात जवळपास ४ लाख व्यापारी असून त्यातील अडीच लाख व्यापारी किरकोळ क्षेत्रातील आहेत. तर २५ टक्के दुकाने ही अत्यावश्यक सेवेतील आहेत. या व्यापारी वर्गाने कोरोना काळात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना केला. मात्र त्यांनी पुन्हा एकदा दुकाने सुरु करण्याचा निर्णय घेतला मात्र दुकानांवर घातलेल्या निर्बंधांमुळे पुन्हा एकदा त्यांना बिकट परिस्थितीचा सामना करावा लागतो आहे. सरकारकडून हा निर्णय बदलण्यात यावा अशी मागणी व्यापारांनी केली आहे.

- Advertisement -

लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथलता आणताना सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असून शनिवार रविवारी अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शनिवार आणि रविवार हे दोन दिवस विक्रीसाठी मुख्य दिवस असतात मात्र या दिवशी दुकाने बंद राहिल्याने व्यापारांचे मोठे नुकसान होत आहे. शनिवार रविवार दुकाने बंद ठेवून सरकारला काय साध्य करायचे आहे हे कळेनासे झाले आहे, असे अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे मुंबई महानगर अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी म्हटले आहे.


हेही वाचा – ठाकरे सरकारने प्रसिद्धीसाठी मोजले 155 कोटी

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -