घरताज्या घडामोडीST Workers Strike : एसटी कामगार विलीनीकरणाचा व्हिडिओ अर्धवट दाखवून दिशाभूल- मुनगंटीवार

ST Workers Strike : एसटी कामगार विलीनीकरणाचा व्हिडिओ अर्धवट दाखवून दिशाभूल- मुनगंटीवार

Subscribe

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटीचे शासकीय सेवेत विलीनीकरण करण्यात यावे अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. दरम्यान एसटीचे विलीनीकरण करण्यात येऊ शकत नाही असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. याच व्हिडिओवरुन राजकीय वर्तुळाच टीकास्त्रे सुरु होती मात्र मुनगंटीवार यांनी यावर प्रतिक्रिया देऊन राज्य सरकारला फटकारले आहे. प्रसारित करण्यात येणारा व्हिडिओ अर्धवट असून समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच हे मरण विकास आघाडी सरकार असल्याचा उल्लेख सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषद घेऊन व्हायरल होणाऱ्या व्हिडिओवरुन राज्य सरकारवर घणाघात केला आहे. मुनगंटीवार म्हणाले की, माझ्या व्हिडिओमध्ये जो माझ्याच मतदारसंघातील एक मतदार आहे. तो एक एसटी कर्मचारी आहे. त्याने मला सांगितले तुम्ही एसटीचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करा, तेव्हा त्याला सांगितले यासाठी शिवसेनेचे मंत्री असणारा हा विभाग आहे त्यांचा प्रस्ताव आल्याशिवाय मला सुमोटो करता येत नाही असे मुनगंटीवार म्हणाले.

- Advertisement -

भाजप आणि शिवसेनेची जेव्हा युती होती. तेव्हा एसटी महामंडळाला सर्वात जास्त निधी हा भाजप देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आणि शिवसेनेसोबत असलेल्या युतीच्या वेळी देण्यात आला होता. आज मुंबईत महिलांसाठी स्वतंत्र ज्या बसेस तेजस्विनीच्या नावाने ज्या देशात जे युती सरकारमधील आहेत. ७०० पेक्षा जास्त बसेस नवीन घेण्यासाठी पैसे उपस्थित केले. १०० पेक्षा जास्त एसटी बस स्थानकाच्या नुतनीकरणासाठी दिल्या होत्या. हे सर्व युतीच्या सरकारमध्ये देण्यात आले.

महाविकास आघाडी नव्हे तर मरण विकणारी आघाडी

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याऐवजी शिमग्याचे राजकारण सुरु केलं आहे. महाविकास आघाडीचा प्रवास हा मरण विकणाऱ्या आघाडीपर्यंत झाला आहे. ३१ पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या त्रासातून मुक्त कऱण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मागण्याच्या संदर्भात संवेदनशीलपणे चर्चा कऱण्याऐवजी एक माझा अतिशय जुना अर्धवट व्हिडिओ प्रसारित करुन या व्हिडिओचा आधार घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांचा खून करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे एसटीचे ब्रीदवाक्य आहे. या लाल रंगाच्या डब्ब्यात अनेकांचे सुख दुःख या एसटीच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी होत सुखामध्ये आणि दुखामध्ये सोबत केली.

- Advertisement -

एखादा विद्यार्थी मुलाखतीला जाण्यासाठीही एसटीचा उपयोग केला. एखाद्याने विवाहासाठी जाताना एसटीचा उपयोग केला. आनंदात एसटी कर्मचारी सहभागी झाले आणि दुखात धीर देण्यासाठीचे काम कर्मचाऱ्यांनी केलं आहे. या कर्मचाऱ्यांना भीती दाखवण्याचे काम या राज्य सरकारने केलं आहे. खबरदार तुम्ही आंदोलन करणाऱ्या नेत्यांची थट्टा कराल त्यांना निलंबनाची भीती दाखवाल तर याद राखा लोकशाहीमध्ये तुम्ही अमरपट्टा लावून आला नाही असा इशारा देखील मुनगंटीवार यांनी दिला आहे.


हेही वाचा:  गुजरातच्या ड्रग्ज कनेक्शनबाबत नवाब मलिकांचा मोठा बॉम्ब 


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -