घरमहाराष्ट्रउसाच्या ट्रॅक्टरची डिझेल टँकरला धडक, लातूरमध्ये सात वाहनं जळून खाक

उसाच्या ट्रॅक्टरची डिझेल टँकरला धडक, लातूरमध्ये सात वाहनं जळून खाक

Subscribe

लातूर – लातूरमध्ये तब्बल सात वाहनं जळून खाक झाली आहेत. लातूरहून उदगीरकडे जाणाऱ्या डिझेल टँकरला उसाच्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. यामुळे डिझेल टँकरला आग लागली. या आगीने रौद्र रुप धारण करून सात वाहनं जळून खाक झाली. अद्यापही जखमींची माहिती समोर आलेली नाही.

आगीचे वृत्त कळताच जिल्ह्यातील पाच पोलीस पथकं घटनास्थळी दाखल झाली असून लातूर उदगीर रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लातूरहून उदगीरकडे जाणाऱ्या वाहनाचा मार्ग बदलण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ च्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे. यामुळे वाहतूक अरुंद रस्त्यावरून वळवण्यात आली आहे. म्हणूनच येथे अपघात झालाच. जागा कमी असल्याने एकापाठोपाठ वाहनं आल्याने सर्व वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यामध्ये उसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर, डिझेलचा टँकर, दोन कार, कापसाची वाहतूक करणारा मोठा ट्रक, एसटी बस आणि ट्रॅक्टरचे हेड ट्रॉली नसलेले वाहन जळाले आहेत.

- Advertisement -

आग एवढी भीषण होती की अग्नीशमन दलाच्या पथकालाही आग विझवताना दमछाक झाली. अपघात होताच तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. बाजूला असलेल्या मांजरा नदीपात्रातून पाण्याची सोय करण्यात आली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -