घरमहाराष्ट्रबहुजन समाजातील ‘त्या’ विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द

बहुजन समाजातील ‘त्या’ विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द

Subscribe

निवडणूक अधिकाऱ्यांनी सूचना केल्यानंतर विश्वविद्यापीठाला त्या विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द करावे लागले. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.

वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विश्वविद्यापीठाने बहुजन समाजातील ६ विद्यार्थ्यांवर अन्यायकारक पद्धतीने केलेले निलंबन रद्द करण्यात आले आहे. काँग्रेसने विद्यापीठाच्या कारवाईची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. निवडणूक अधिकाऱ्यांनी सूचना केल्यानंतर विश्वविद्यापीठाला त्या विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द करावे लागले. अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.

निलंबनाची कारवाई केलेल्यांवर कारवाई व्हावी

समाजामध्ये घडणाऱ्या वाईट घटना पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून देण्याचे काम ६ विद्यार्थ्यांनी केले. या प्रकरणी विश्वविद्यालयाने त्या ६ विद्यार्थ्यांना निलंबित केले. या घटनेची माहिती मिळताच काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने विद्यापीठ प्रशासनावर कारवाईची मागणी केली होती. तक्रारीची दखल घेत विद्यार्थ्यांचे निलंबन रद्द करण्यात आले आहे. पण असे असले तरी ज्यांनी विद्यार्थ्यांवर निलंबनाची कारवाई केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे या मागणीवर काँग्रेस ठाम असल्याचे सचिन सावंत म्हणाले.

- Advertisement -

मनुवादी विचारधारा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न

मागील ५ वर्षांमध्ये मनुवादी विचारधारा प्रस्थापित करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक केले जात असून बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचा आवाज बंद करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे दिसून आले आहे. वर्धा येथील महात्मा गांधी हिंदी विद्यापीठातील विद्यार्थी हे कोणत्याही पक्षाशी संबंधित नाहीत. सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांना देशद्रोही ठरवणे, त्यांच्यावर खटले दाखल करून आवाज दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतु, काँग्रेस पक्ष अशा कोणत्याही धमक्यांना घाबरत नसून भविष्यातही या विचारधारेच्या विरोधात लढा सुरुच राहिल असे सचिन सावंत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -