घरताज्या घडामोडीआरोग्य खात्यातील बदल्यांना 24 तासातच स्थगिती

आरोग्य खात्यातील बदल्यांना 24 तासातच स्थगिती

Subscribe

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी अशा 22 अधिकाऱ्यांच्या बदलीचे काल दुपारी आदेश देण्यात आले होते. मात्र याला 24 तासांतच स्थिगिती देण्याचे आदेश आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिले आहेत. माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे अभियान सुरू असल्याने या बदल्यांना तात्पुरती स्थगिती दिल्याचे पत्र सावंतांनी काढले आहेत. त्यामुळे नव्या ठिकाणी रुजू होण्यासाठी निघालेल्या अधिकाऱ्यांना माघारी फिरावे लागले.

राज्यातील 17 अधिकाऱ्यांना सहसंचालक, उपसंचालक तर 5 जणांना जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून पदस्थापना देण्यात आली होती. यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, विशेष तज्ज्ञ, जिल्हा शल्य चिकित्सक या अधिकाऱ्यांना बढती देण्यात आली होती. यामधील काही अधिकाऱ्यांना पदावनत करून पदस्थापना दिली होती. तसेच सोमवारी हे अधिकारी रुजू होण्याच्या तयारीत होते. मात्र, या बदल्यांना 24 तासांच्या आतच आरोग्य मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे.

- Advertisement -

या बदल्यांच्या स्थगितीचे पत्र आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी जारी केले आहे. या पत्रात आरोग्यमंत्र्यांनी नमुद केले आहे की, माता सुरक्षित, घर सुरक्षित अभियान सुरू असल्याने प्रशासकीय कारणास्तव 11 नोव्हेंबर रोजीचे प्रशासकीय बदली अंमलबजावणीस पुढील आदेश होईपर्यंत तात्पुरती स्थगिती देण्यात येत आहे. दरम्यान, या बदली प्रक्रियेत बीड जिल्हा आरोग्य विभागात यशस्वीरित्या काम करणाऱ्या डॉक्टर मंडळींना मानाच्या आणि महत्त्वाच्या पदावर स्थान देण्यात आले आहे. परंतु आता या प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मुंबईतील पोलीस दलात मोठे फेरबदल, 28 अधिकाऱ्यांच्या बदल्या


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -