Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी नगर- औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात: पाच जण जागीच ठार

नगर- औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात: पाच जण जागीच ठार

मात्र बसमधील कोणालाही दुखापत झालेली नाही

Related Story

- Advertisement -

अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. खासगी ट्रॅव्हल्स आणि कारमध्ये झालेल्या या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आज पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात घडला असून यात दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अपघात झालेल्या कारमधील मृत हे जालना जिल्ह्यातील रहिवाशी होते. मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे २ च्या सुमारास स्वीफ्ट कार औरंगाबादहून अहमदनगरच्या दिशेने येत होती. याचदरम्यान देवगड फाट्याजवळून नगरच्या दिशेने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बस आणि या कारची धडक झाली. या ट्रॅव्हल्सच्या जब्बर धडकेने कारमधील पाच जण जागीच मृत पावले. हा अपघात इतका भीषण होता की कार बसच्या समोरील बाजूत जाऊन घुसली. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची भीषणात इतकी होती की आवाजामुळे परिसरातील ग्रामस्थही जमा झाले होते.

या अपघाताची माहिती मिळताच नेवाशाचे फौजदार भरत दाते, पोलिस सहकारी पोलिस कर्मचारी अशोक नागरगोजे, बबन तमनर, दिलीप कुऱ्हाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जखमींनी पाचही जण उपचारांपूर्वीच दगावले. मात्र बसमधील कोणालाही दुखापत झालेली नाही. हा अपघात नेमका कशामुळे झाले हे अद्याप स्पष्ट झालेला नाही. दोन्ही वाहने भरधाव वेगात असल्याने चालकांचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघाताचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.


हेही वाचा- धक्कादायक : घरात हळदीच्या कार्यक्रमादरम्यान प्राणघातक हल्ला

- Advertisement -

 

- Advertisement -