Sunday, February 28, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन Video: प्रियंका चोप्रानं निकला दिलं अनोखं सरप्राईज; म्हणाला...

Video: प्रियंका चोप्रानं निकला दिलं अनोखं सरप्राईज; म्हणाला…

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री प्रियंका चोप्राचे जगभरात करोडो चाहते असले तरी ती फक्त तिचा नवरा निक जोनस यांची चाहती आहे. सध्या सोशल मीडियावर प्रियंका आणि तिचा नवरा निक जोनस यांचीच चर्चा रंगताना दिसते. त्यांच्यातील प्रेम असो किंवा कॅमेस्ट्री चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेचा विषय ठरते. नुकताच प्रियंकाचा नवरा निकने जोनसने रोमँटिक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ निकने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये प्रियंका दिसत नसली तरी निकची बायको प्रियंका हिच्याबद्दल काही तरी रोमँटिक अंदाजात बोलताना दिसतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by NICK JONɅS (@nickjonas)

- Advertisement -

हा व्हिडिओ निक जोनस रविवारी शेअर केला. हा व्हिडिओ शेअर करताना निकने असे कॅप्शन दिले की. ‘Verified
My wife surprised me (all the way from London) with this today. 🚀👩‍🚀😍 thank you @priyankachopra you’re the best. SNL here we come!’ या व्हिडिओमध्ये निक एका रूममध्ये दिसत असून ती रूम डेकोरेट केलेली दिसतेय. तर फुग्यांनी ही निकची रूम प्रियंकाने सजवून निकला अनोखं सरप्राईझ दिले आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ साधारण 7 लाख वेळा पाहिला गेला आहे. तर 3 लाख 73 हजार 833 जणांनी लाईक्स केले आहे. सध्या प्रियंका पूर्णपणे हॉलिवूडमध्ये जाण्याची तयारी करत आहे. ती अनेकदा तिच्या चाहत्यांना तिच्या आगामी प्रोजेक्टस बद्दल सांगत असते.

प्रियंका नुकतीच नेटफ्लिक्स सीराज ‘वी कॅन बी हिरोज’ आणि ‘द व्हाईट टायगर’ मध्ये दिसली होती. सध्या ती अ‍ॅमेझॉनची सीरीज ‘सिटडेल’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रिचर्ड मॅडन आणि अ‍ॅशले कमिंग्जही यात काम करत आहेत. याशिवाय प्रियंकाकडे आणखी बरेच चित्रपट आहेत ज्यात ‘द मॅट्रिक्स 4’, ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि मिंडी कलिंगसह रोमँटिक कॉमेडीचा समावेश आहे. याशिवाय ती अ‍ॅमेझॉनच्या ‘संगीत’ या सीरीज मध्येही अभिनय करताना दिसणार आहे.

- Advertisement -