घरमहाराष्ट्रदहावी, बारावीची फेरपरीक्षा नोव्हेंबरमध्ये

दहावी, बारावीची फेरपरीक्षा नोव्हेंबरमध्ये

Subscribe

दहावी, बारावी परीक्षेस नियमित पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांची अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

कोरोनामुळे दहावी, बारावीचा निकाल विलंबाने जाहीर झाला. त्यामुळे राज्य मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणारी फेरपरीक्षा नोव्हेबर-डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास २० ते २९ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. दहावी, बारावी परीक्षेस नियमित पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेंतर्गत परीक्षेला बसणार्‍या विद्यार्थ्यांची अर्ज ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत.

दहावी, बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर फेरपरीक्षेबाबत राज्य मंडळाकडून कोणताही निर्णय जाहीर करण्यात येत नव्हता. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. परीक्षा कधी होणार, आम्हाला पुढील वर्षामध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध होईल का असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत होता. मात्र आता माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्राची (बारावी) परीक्षा नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत. अर्ज भरण्यास २० ते २९ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर विलंब शुल्कासह ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांच्या माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जाऊन भरायची आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -