घरमहाराष्ट्रसरकारचं कौतुक करा म्हणून सेनाभवनातून कलाकारांना फोन जातात; नितेश राणेंचा गंभीर आरोप

सरकारचं कौतुक करा म्हणून सेनाभवनातून कलाकारांना फोन जातात; नितेश राणेंचा गंभीर आरोप

Subscribe

राज्यातील ठाकरे सरकार आपली प्रतिमा संवर्धनासाठी बॉलिवूडमधील कलाकारांकडून ट्विट करुन घेत आहे. यासाठी शिवसेना भवनातून अनेक कलाकारांना फोन केले जात असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी हे आरोप केले आहेत.

ठाकरे सरकारने आपल्या प्रतिमा संवर्धनासाठी रेन ड्रॉप या एजन्सीला काम दिलं आहे. ही एजन्सी अभिनेत्री दिशा पटानी, करिना कपूर, कतरिना कैफ, फरहान अख्तर यांच्यासारख्या अनेक कलाकारांच्या संपर्कात आहे. तुम्ही करिना कपूर किंवा कतरिना कैफ यांची अलीकडची ट्विटस बघा. या बॉलिवूड सेलिब्रिटींकडून पैसे देऊन ट्विट करवून घेतलं जात आहे, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. यासंदर्भातील सर्व पुरावे माझ्याजवळ असून येत्या आगामी अधिवेशनात मी सर्व पुरावे मांडून यांना उघडं पाडणार आहे, असं राणे म्हणाले.

- Advertisement -

कोणाला आतापर्यंत किती पैसे देण्यात आले, किती बिलं झाली याची सर्व मला माहिती आहे. छोट्या कलाकारांना ट्विट करण्यासाठी साधारण तीन लाख रुपये आणि बड्या कलाकारांना त्यापेक्षाही अधिकची रक्कम दिली जाते. त्यासाठी थेट सेनाभवनातून या बॉलिवूड सेलिब्रिटींना फोन केले जातात, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

‘मुंबई मॉडेल’ इतकेच यशस्वी असेल तर लॉकडाऊन कशाला?

मुंबई मॉडेल इतकेच यशस्वी असेल तर लॉकडाऊन ३१ मे पर्यंत का वाढवण्यात आला, असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव आहे. बेडस आणि ऑक्सिजनचा अजूनही तुटवडा आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये लॉकडाऊन हटवण्याची हिंमत नाही, असं नितेश राणे म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -