घरमहाराष्ट्ररडणारा पंतप्रधान देशाने पहिल्यांदा पाहिला; कालचा कार्यक्रम म्हणजे...राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

रडणारा पंतप्रधान देशाने पहिल्यांदा पाहिला; कालचा कार्यक्रम म्हणजे…राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

Subscribe

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. रविवारी, 30 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शंभरावा मन की बात कार्यक्रम झाला. यासाटी भाजपने देशभरात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच कार्यक्रमावर टीका करत राऊत म्हणाले की, कालचा कार्यक्रम हा टाळ्या वाजवण्याचा इव्हेंट होता. तसंच, रडणारा पंतप्रधान देशानं पहिल्यांदा पाहिल्याचंही राऊत यावेळी म्हणाले.  ( Thackeray Group leader Sanjay Raut Criticised PM Narendra Modi over his Man ki Baat Program )

मोदींनी जन की बात ऐकावी

राऊत म्हणाले की, मन की बात काय आहे? जन की बात ऐकावी. कोरोना काळात जसं थाळ्या वाजवण्याचा इव्हेंट झाला तसा कालचा टाळ्या वाजवण्याचा इव्हेंट होता. प्रधानमंत्र्यांचे भाषण प्रेरणादायी असायला हवे. मात्र, देशभरात लोकांना भाषण ऐकण्यासाठी एकत्र करण्यात आले. ज्यांना ऐकायचं ते ऐकतील.

- Advertisement -

अभिनेत्यांपासून इतर सगळं लोक घेऊन जो इव्हेंट केला. त्याची देशाला गरज होती का? याची भाजपला गरज होती का? याची भाजपला गरज होती. म्हणून त्यांनी तो कार्यक्रम केला. हा त्यांचा प्रश्न आहे, असे राऊत म्हणाले.

रडणारा पंतप्रधान पहिल्यांदाच पाहिला

देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना संविधाावर अजिबात प्रेम नाही. संविधानापेक्षा पंतप्रधानांच मन की बातवर जास्त प्रेम आहे. जर संविधानावर प्रेम असतं तर पंतप्रधानांवर मला लोक शिव्या देतात अस सांगत 91 शिव्यांची यादी वाचून दाखवण्याची वेळ पंतप्रधान मोदींवर आली आहे, असाही टोला राऊत यांनी लगावला. प्रियंका गांधी यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. लाल बहाद्दूर शास्त्री, पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी या सगळ्यांना शिव्या दिल्या गेल्या. मात्र, त्यांनी कोणीही त्याचा वापर मतं मिळवण्यासाठी केला नाही. आपले पंतप्रधान प्रचारसभेत शिव्या वाचून दाखवत आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रातलं सरकार हे गेंड्याच्या कातडीचे आहे. खारघरच्या 16 मृत्यूंबद्दल असं सरकार शांत बसलं यातच सगळं आलं असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

मविआचाच मुख्यमंत्री होणार

अजित पवार आणि जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होणार असल्याचे म्हटले होते. यावर येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार आहे, असे राऊत म्हणाले. कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करण्यात येत आहेत, असेही राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -