घरमहाराष्ट्रनितीन देशमुखांची संघर्ष यात्रा अडवली; नागपूर पोलीस अमरावतीच्या दिशेने रवाना

नितीन देशमुखांची संघर्ष यात्रा अडवली; नागपूर पोलीस अमरावतीच्या दिशेने रवाना

Subscribe

मुंबई | ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांची ‘संघर्ष यात्रा’ नागपूर पोलिसांनी अडवली आहे. अमरावती आणि अकोला जिल्ह्यातील ६९ गावांची पाणी पुरवठा योजनेला राज्य सरकारने स्थगिती दिल्याच्या विरोधात नितीन देशमुखांनी आज संघर्ष यात्रा (Sangharsh Yatra) काढली होती. नितीन देशमुख ही संघर्ष यात्रा नागपूरपर्यंत नेहणार होते. परंतु, पोलिसांची परवानगी नसल्याने नितीन देशमुखांची संघर्ष यात्रामध्येच अडविण्यात आली. यानंतर नागपूर पोलिसांनी नितीन देशमुख यांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर पोलीस नितीन देशमुखांना घेऊन अमवरातीच्या दिशेन रवाना झाले आहेत.

तसेच नितीन देशमुखांची संघर्ष यात्रा अडविल्यानंतर त्यांनी नागपूर पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. नितीन देशमुख म्हणाले, “नागपूर पोलीस हे कायद्याचा दुरुपयोग करत आहेत. पोलिसांनी आम्हाला मारहाण केली असून माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांवर गृहमंत्र्यांचा प्रचंड दबाव आहे. परंतु, काहीही झाले तरी आम्ही माघार घेणार नाही”, असे ते म्हणाले.

- Advertisement -

नेमके काय आहे प्रकरण

महाविकास आघाडी सरकार असताना अकोला आणि अमरावती जिल्ह्यातील ६९ गावांना गोड्या पाण्याचा पुरवठा होण्यासाठी पाणी पुरवठा योजनेला मंजुरी देण्यात आली होती. सध्या त्याचे काम सुरू झाले होते. या ६९ गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी वान धरण आरक्षित करण्यात आले होते. परंतु, तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांनी याला विरोध केला. यानंतर स्थानिक भाजपच्या लोकप्रतिनिधींनी पाणी पुरवठा योजनेच्या स्थगिती देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरला. यानंतर फडणवीसांनी पाणी पुरवठा योजनेला स्थगिती दिली. यामुळेच नितीन देशमुखांनी राज्य सरकार विरोधात आक्रमक पावित्रा घेतला आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -