घरताज्या घडामोडीयामुळे एकनाथ खडसे EDच्या चौकशीला हजर राहण्याची शक्यता कमी

यामुळे एकनाथ खडसे EDच्या चौकशीला हजर राहण्याची शक्यता कमी

Subscribe

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची आज भोसरी भूखंड प्रकरणी ईडीची चौकशी होणार आहे. पण आता एकनाथ खडसे यांच्यात कोरोना व्हायरसची लक्षणे दिसल्यामुळे त्याची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. त्यांचा कोरोना अहवाल प्रतीक्षेत आहे, अशी माहिती एकनाथ खडसे यांच्या सूनबाई खासदार रक्षा खडसे यांनी दिली आहे. त्यामुळे कोरोना चाचणीचा अहवाल आल्यानंतरच ईडीच्या चौकशीला जाण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल अशी माहिती समोर येत आहे.

भोसरी भूखंड प्रकरणी आज एकनाथ खडसे यांना ईडी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. त्यामुळे ईडी चौकशीच्या निमित्ताने कालपासूनच एकनाथ खडसे मुंबईत दाखल झाले आहेत. पण गेल्या दोन दिवसांपासून एकनाथ खडसे यांची तब्येत ठिक नसल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या चाचणीचा अहवाल आल्यानंतर ते ईडीच्या कार्यालयात हजर राहणार की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल. दरम्यान एकनाथ खडसे यांचा कोरोना अहवाल ११ ते ११.३० पर्यंत येण्याची शक्यता असल्याची माहिती सूनबाई रक्षा खडसे यांच्याकडून मिळाली आहे.

- Advertisement -

एकनाथ खडसे यांची यापूर्वी याप्रकरणी चार वेळा चौकशी झाली आहे. ही पाचव्यात त्यांची चौकशी होणार आहे. याबाबत एकनाथ खडसे म्हणाले होते की, ‘मला ईडीचा ३० डिसेंबरला हजर राहण्याचा समन्स मिळाला आहे. यापूर्वी या घटनेची माझी चौकशी झाली आहे. जे सहकार्य त्यांना लागले आहे ते मी पुरवले आहे. आता देखील मी त्यांना सहकार्य करेल.’


हेही वाचा – ‘डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचं भविष्य’

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -