घरताज्या घडामोडीमुंबई महापालिकेत देशातील सर्वात मोठा घोटाळा; भाजपाच्या अमित साटम यांचा गंभीर आरोप

मुंबई महापालिकेत देशातील सर्वात मोठा घोटाळा; भाजपाच्या अमित साटम यांचा गंभीर आरोप

Subscribe

'बीएमसी म्हणजे भ्रष्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन, १९९७ ते २०२२ या २५ वर्षाच्या कालावधीत मुंबई महापालिकेत या देशात सर्वाधिक मोठा भ्रष्टाचार झाला', असा गौप्यस्फोट भाजपा आमदार अमित साटम यांनी विधानसभेत केला.

‘बीएमसी म्हणजे भ्रष्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन, १९९७ ते २०२२ या २५ वर्षाच्या कालावधीत मुंबई महापालिकेत या देशात सर्वाधिक मोठा भ्रष्टाचार झाला’, असा गौप्यस्फोट भाजपा आमदार अमित साटम यांनी विधानसभेत केला. विधानसभेत नियम २९३ अंतर्गत मुंबई, एमएमआर विभागातील समस्यांबाबत चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेमध्ये बोलताना साटम यांनी ‘मुंबई महापालिका आयुक्तांच्या कॅबिनमध्ये संध्याकाळी ६ ते रात्री ९ या दरम्यान कोण कोण येते हे सीसीटीव्हीत चेक करा. मुंबई महापालिकेच्या इतिहासात सर्वात भ्रष्ट आयुक्त हे सध्याचे आहेत हे जबाबदारीने बोलतो’, असेही साटम यांनी म्हटले. (The biggest scam in the country in the municipal corporation BJP’s Amit Satam is a serious allegation)

‘मुंबई शहराला लागलेली ही कीड आहे. अमेरिकेत कोण आहेत त्यांच्याकडे पार्सल जाते. हा मुंबईकरांचा टॅक्सचा पैसा आहे. कुणाच्या घरी जाण्यासाठी हा पैसा नाही. याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं मुंबई शहर आहे. परंतु पायाभूत सुविधा त्या दर्जाच्या आहेत का? निवृत्त न्यायाधीशांमार्फत या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी. त्याचसोबत मुंबई महापालिकेचे ऑडिट करण्यात यावे’, अशी मागणी भाजपा आमदार अमित साटम यांनी विधानसभेत केली असून, महापालिकेवर टीका केली.

- Advertisement -

“कोल स्कॅम, टू जी स्कॅम, पीडब्ल्यूडी स्कॅम हे काहीच नाही. ३ लाख कोटीहून अधिक घोटाळा या मुंबई महापालिकेत झाला आहे. रस्ते, शाळा, उद्यान यासह भंगारातही घोटाळा झाला आहे. रेमडेशिवीर इंजेक्शनसाठी मुंबईकर जनता वणवण फिरत होती. त्या कोरोना काळातही सत्ताधाऱ्यांनी ३ हजार कोटींचा घोटाळा केला”, असेही साटम यांनी म्हटले

“२०२०-२२ या कोरोनाच्या काळात झालेला भ्रष्टाचार हा मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा कळस आहे. याठिकाणीही महापालिका आयुक्तांच्या रुपात सचिन वाझे बसलाय. वाझेगिरी करतात. अतिरिक्त आयुक्त आणि आयुक्त हे दोघे मिळून विरप्पन गँग चालवतात. मुंबईच्या रस्त्यांवर झोल झोल, बीएमसीवर भरवसा नाही का” असे गाणे काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाले होते. मुंबईतील खरी समस्या प्रवासी वाहतूक, गृहनिर्माण हे आहेत. मुंबईतले रस्ते जगात प्रसिद्ध आहेत. १९९५ मध्ये एसआरएची स्थापना झाली. एसआरए, म्हाडाला भ्रष्टाचाराचा खूप मोठा विळखा लागला आहे”, असेही साटम यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – …तोपर्यंत देशात लोकशाही राहील बेबंदशाही येणार नाही- उद्धव ठाकरे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -