घरमहाराष्ट्रनाशिकबेवारस आढळलेल्या मुला-मुलींना प्रतीक्षा आपल्या माणसांची

बेवारस आढळलेल्या मुला-मुलींना प्रतीक्षा आपल्या माणसांची

Subscribe

नाशिक : शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी अल्पवयीन तीन मुले व दोन मुली विनापालक आढळून आल्या आहेत. त्यांच्या आई, वडील व नातलगांचा जिल्हा व बाल कल्याण समिती, नाशिकतर्फे शोध घेतला जात आहे. मात्र, अद्यापपावेतो मुलामुलींचा दावा करण्यास कोणीही आलेले नाही. ३० दिवसांच्या आत बालकांचा दावा करण्यास कोणी आले नाही तर त्यांना पालक नसल्याचे गृहीत धरुन पुढील पुनर्वसनाचा विचार केला जाईल. बालकांनी पालकांनी संपर्क साधावा, असे आवाहन नाशिक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अजय फडोळ यांनी केले आहे.

रेल्वेत आढळला बिट्टू रघुवर
बिट्टू रघुवर हा ३ मे २०१६ रोजी सचखंड एक्सप्रेसमध्ये प्रवास करताना मनमाड आर. पी. एफ. पोलिसांना सापडला. बिट्टूला त्याचे नाव सांगता येत आहे. त्यास दोन भाऊ असल्याचेही तो सांगत आहे. मात्र, तो पालकांचे नाव व पत्ता सांगण्यास असमर्थ आहे. त्यास बाल कल्याण समिती, नाशिक यांच्या बदली आदेशाने ८ जुलै २०१७ रोजी संस्थेत दाखल करण्यात आले आहे. संस्थेत आल्यापासून त्यास पालक व इतर नातेवाईक कोणीही मागील सहा वर्षे पाच महिन्यांत भेट घेण्यास आली नाही. तो आई-वडिलांची वाट बघत आहे. बिट्टू रघुवर याच्या पालकांनी ३० दिवसांच्या आत मोची कॉर्नर, एस. आर. पी. कॅम्पजवळ, मालेगाव 423105 या संस्थेत 025534-254759 या क्रमांकावर किंवा बाल कल्याण समिती, उंटवाडी, नाशिक, जिल्हा बालसंरक्षण कक्ष, नाशिक यांच्याशी संपर्क साधवा.

- Advertisement -

 

क्रिश सापडला रेल्वे स्टेशनवर
क्रिश किरण सोनवणे हा नाशिक रेल्वे स्टेशन येथे रेल्वे चाईल्ड लाईन नाशिकच्या कर्मचार्‍यांना विनापालक आढळून आला आहे. बाल कल्याण समितीच्या आदेशाने त्यास ११ फेब्रुवारी २०२२ रोजी शेल्टर डॉन बॉस्को संस्थेत दाखल करण्यात आले आहे. परी किरण सोनवणे ही त्याची बहीण आहे. ती बाल कल्याण समितीच्या आदेशाने २० डिसेंबर २०१९ रोजी आधाराश्रम, नाशिक या संस्थेत दाखल झाली आहे. तिची आई सुमन किरण सोनवणे ही २० डिसेंबर २०१९ रोजी भेटण्यास आली. त्यानंतर तिची आई व नातेवाईक कोणीही दोन वर्षे ९ महिन्यांपासून भेटण्यास आलेले नाही. ती आई-वडिलांची वाट बघत आहे. क्रिशच्या आई-वडिलांनी ३० दिवसांच्या आत शेल्टर डॉन बास्को, १८१, जी. डी. रोड, नाशिक या संस्थेत 0253-808842 व भूषण 7517041011 या क्रमांकावर किंवा बालकल्याण समिती, जिल्हा बालसंरक्षण कक्षाशी संपर्क साधवा.

- Advertisement -

 

आई, वडील, आजोबांच्या निधनानंतर कोमल झाली पोरकी
कोमल रघुनाथ खरके (वय १६) हिला बालकल्याण समितीच्या आदेशाने आधाराश्रमात दाखल करण्यात आले होते. तिला पुढील पुनर्वसनाच्या दृष्टीकोनातून मुलींचे बालगृह, कापूरजीरा पाडा, पेठ या संस्थेत दाखल करण्यात आले. त्यानंतर ती आश्रय संस्कार संस्था, मालेगाव या संस्थेत दाखल झाली. १ जुलै २०२० रोजी बदली आदेशानुसार तिला काशीरामदादा बालगृह, आभोणा या संस्थेत दाखल करण्यात आले. १८ जुलै २०२२ रोजी तिला आशीर्वाद सेवाधाम ट्रस्ट, बालसदन, नाशिक या संस्थेत दाखल करण्यात आले. तिच्या आई, वडील व आजोबांचे निधन झाले आहे. तिला एक बहीण काजल असून, ती काशीरामदादा बालगृह, आभोणा या संस्थेत दाखल झाली आहे. तिच्या पालकांनी शेल्टर डॉन बॉस्को संस्था 0253-808842 किंवा बालकल्याण समिती येथे संपर्क साधावा.

 

सिटी सेंटर मॉलजवळ आढळली अनुराधा
अनुराधा रवी पूर्वे (वय १२) ही १७ ऑक्टोबर २०११ रोजी गंगापूर पोलीस ठाण्यामार्फत बालकल्याण समिती, नाशिकच्या आदेशाने आधाराश्रम, या संस्थेत दाखल झाली होती. पुढील पुनर्वसनासाठी तिला गार्डा बालसदन दाखल करण्यात आले. ती पोलिसांना सिटी सेंटर मॉलजवळ विनापालक आढळून आली. याप्रकरणी तिच्या आईवर गुन्हा दाखल करण्यात आला. ती जामिनावर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पोलिसांनी तिचा पत्त्यानुसार शोध घेतला मात्र ती आढळून आली नाही. तिच्या पालकांनी बाल कल्याण समिती, उंटवाडी, नाशिक, जिल्हा बालसंरक्षण कक्ष, नाशिक यांच्याशी संपर्क साधवा.

 

वडनेर खाकुर्डीला आढळला २० दिवसाचा कार्तिक
कार्तिक (वय २० दिवस) हा १ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान वडनेर खाकुर्डी पोलीस ठाणे (ता. मालेगाव)च्या हद्दीत विनापालक आढळून आला. त्यास शासकीय रुग्णालय, मालेगाव येथे दाखल करण्यात आले होते. ४ ऑक्टोबर २०२२ रोजी बालकल्याण समितीच्या आदेशाने त्यास आधाराश्रम, नाशिक येथे दाखल करण्यात आले आहे. कार्तिकच्या पालकांनी आधाराश्रम संस्था, घारपुरे घाट, नाशिक 253-2580309/2950309, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष, नाशिक समाज कल्याण आवार, नाशिक-पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक 0253-2236368 या ठिकाणी संपर्क साधावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -