घरमहाराष्ट्रअलिबाग-मुरुड मार्गावरील काशीद येथील पूल कोसळला

अलिबाग-मुरुड मार्गावरील काशीद येथील पूल कोसळला

Subscribe

अलिबाग-मुरुड मार्गावरील काशीद येथील ब्रिटिशकालीन जीर्ण पूल खचून रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास कोसळला असल्याची माहिती मिळतेय. या घटनेमुळे महाड येथील सावित्री पुलावरील काळ्या आठवणी पुन्हा जागा झाल्या असल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग-मुरुड मार्गावरील काशीद या पुलावरून मोटासायकल तसेच एक चारचाकी वाहन जात असतानाच पूल दुभंगला आणि या सर्व गाड्या नदीच्या प्रवाहात वाहून गेल्यात. या चारचाकी गाडीमधील ४ जणांना वाचवण्यात यश आलं तर मोटार सायकलवर असणाऱ्या व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण ६ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीला किरकोळ जख्मी असल्याची माहिती आहे. या दुर्घटनेमुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊ नये म्हणून मुरुडकडे जाणारी वाहतूक ही रोहा सुपेगाव मार्गे वळवण्यात आली आहे. तसेच पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आलं आहे.

- Advertisement -

काशीद येथील हा ब्रिटिशकालीन पूल जीर्ण झाला असल्याने त्याच्या दुरुस्तीची मागणी काही वर्षांपासून केली जात होती. मात्र संबंधित खात्याचे त्याकडे दुर्लक्ष होते. त्यातच आज सकाळपासून मुरुड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत होता. रात्री साडेआठच्या सुमारात जीर्ण झालेला पूल कोसळला. या पुलावरून त्यावेळी एक कार आणि एक मोटरसायकल जात होता. कार आणि मोटरसायकल प्रवाहात कोसळली. उपस्थितांनी कारमधून पाण्यात पडलेल्या चौघांना वाचवले. मात्र मोटरसायकलस्वाराचा बुडून मृत्यू झाला. मोटासायकलवरील एक जण सुखरूप बाहेर आला, मात्र एक जण बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -