Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Live Update: राज्यात २४ तासात ७ हजार ६०३ कोरोनाबाधितांची नोंद, तर ५३...

Live Update: राज्यात २४ तासात ७ हजार ६०३ कोरोनाबाधितांची नोंद, तर ५३ कोरोना रुग्णांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

डॉमिनिकामधील कोर्टानं मेहूल चोक्सीला दिला जामीन, अँटिग्वाला जाण्याची दिली परवानगी

मेहूल चोक्सीची प्रकृती बिघडल्याने कोर्टानं जामीन दिला आहे. उपचार करण्यासाठी अँटिग्वाला जाण्याची परवानगीही देण्यात आली आहे.


- Advertisement -

लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लवकरच लोकल प्रवासाला परवानगी मिळण्याची शक्यता, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या पत्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. ( सविस्तर बातमी वाचण्यसाठी इथे क्लिक करा)


Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, ७०१ रुग्णांची कोरोनावर मात

- Advertisement -

मुंबईत गेल्या २४ तासात ४७८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. (सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


maharashtra corona update : राज्यात २४ तासात ७ हजार ६०३ कोरोनाबाधितांची नोंद, तर ५३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात मागील २४ तासात १५ हजार २२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ( सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा )


NEET UG 2021 Date: नीट यूजी परीक्षेची तारीख जाहीर सप्टेंबरमध्ये होणार परीक्षेला सुरावात (सविस्तर बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा)


राजापूरमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राजापूरच्या अनेक गावात पाणी शिरलं आहे. घर आणि दुकानांच्या छपार पर्यंत पाणी पातळी पोहोचली आहे. त्यामुळे गावातील अनेक लोकांची सुटका करण्यासाठी बोटींचा वापर करावा लागत आहे.


देशात सातत्याने वस्तूची किंमत वाढ होत आहे आणि यामुळे सर्वसामान्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे गरीब लोकं त्रस्त आहेत. अनेक तरुणांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. अशा परिस्थिती एकबाजूला कोविड महामारी आणि दुसऱ्या बाजूला महागाई. मोदी नेहमी बोलायचे, मी देशांच्या लोकांना सुखी ठेवून, सुख आणि समृद्धीसोबत देशाला पुढे नेईन अशा प्रकार देशाकडून मत मागितली. काँग्रेसला ७० वर्ष दिलं आता मला ५ वर्षांसाठी निवडून द्या म्हणाले. आता सत्तेत आल्यानंतर देशाची काय हलत आहे. त्याच्या सत्तेत देशात पेट्रोल-डिझेलची किंमती वाढत आहेत, असे जी.एस.मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.


पावसामुळे सिंधुदुर्गातील वैभववाडी येथील करूळ घाट खचल्याचे समोर आले आहे. घाटा जवळील मोरी येथील भाग खचून गेला आहे. त्यामुळे सध्या करूळ घाटातून एकेरी वाहतूक सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्राला कोकणासोबत जोडणारा हा सर्वात महत्त्वाचा घाट आहे.


मुंबईच्या अनेक भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत चार दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.


बीडमध्ये अजून भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा देण्याचं सत्र सुरुच आहे. आतापर्यंत ८० जणांनी राजीनामे दिले आहेत. मंत्रीपद न मिळाल्यामुळे अजूनही समर्थक नाराज आहेत. पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देण्याची मागणी केली जातेय


राज्यसभा आणि विरोधी पक्षनेते जी.एस.मल्लिकार्जुन खर्गे आज दुपारी एक वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यावेळेस एआयसीसीचे जीएस प्रभारी महाराष्ट्र एच. के. पाटील, एमपीसीसीचे अध्यक्ष नाना पटोले, सीएलपी नेते बाळासाहेब थोरात, पीडब्ल्यूडी मंत्री अशोक चव्हाण उपस्थित असणार आहेत.


झायडस कॅडिलाच्या कोरोना लसीला आपात्कालीन वापराच्या मान्यतेसाठी आणखीन काही दिवस लागतील, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. याबाबतचे ट्वीट एनएनआय वृत्तसंस्थेने केले आहे.


देशात २४ तासांत ३७ हजार १५४ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ५० हजार ८९९वर पोहोचला आहे. तर रिकव्हरी होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के झाले आहे.


मुंबईत आज तीन दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रावर लस देण्यास आज सुरू होणार आहे. तीन दिवसांनंतर लसीकरण होत असल्यामुळे गोरेगावच्या नेस्को सेंटरबाहेर पहाटेपासून नागरिकांचा रांगाच रांगा लागल्या आहेत. पहाटे पाच वाजल्यापासून लोकं लस घेण्यासाठी रांगेत उभे आहे. वांद्र्यातील बीकेसी केंद्रावर आज पुन्हा गोंधळ झाला आहे. केंद्रावर लस देण्यावरून नागरिकांची कर्मचाऱ्यांसोबत बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे.


वीज कोसळून उत्तर प्रदेश आणि राजस्थानात ५० जणांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. यापैकी राजस्थानच्या जयपूरमध्ये २० जणांचा तर उत्तर प्रदेशातील ३० जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस सुरू आहे.


अभिनेता सुनील शेट्टी राहत असलेली मुंबईतील इमारत सील करण्यात आली आहे. पालिकेच्या नियमानुसार पाचपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळल्यास इमारत सील करण्यात येत. त्यानुसार सुनील शेट्टी राहत असलेली अल्टामाऊंट रोडवरील पृथ्वी अपार्टमेंटवर महापालिकेने कारवाई केली आहे. विशेष म्हणजे सुनील शेट्टी किंवा त्यांच्या कुटुंबियांतील इतर कोणालाही कोरोनाची लागण झाली नाही आहे. जेव्हा या इमारतीमधील कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या ५ पेक्षा कमी होईल तेव्हा या इमारतीचा सील काढून तेथील निर्बंध शिथिल करण्यात येतील.


पुढचे पाच दिवस राज्यात सर्वत्र चांगला पाऊस पडणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे कोकणाला पुढचे दोन दिवस ‘रेड अलर्ट’ तर मुंबईला पुढचे चार दिवस ‘ऑरेंज अलर्ट’ असणार आहे. तसेच मराठवाडा विदर्भातही चांगल्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -