घरताज्या घडामोडीविद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होणार; दीपक केसरकरांची माहिती

विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होणार; दीपक केसरकरांची माहिती

Subscribe

गणेशोत्सवाच्या काळात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नयेत, या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज केसरकर यांची भेट घेतली. त्यावेळी बोलताना केसरकर म्हणाले की, सर्व शाळांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासूनच द्विभाषिक पाठ्यपुस्तके देण्यात येतील.

विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दफ्तराचे ओझे कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकाचे तीन भाग केले जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी होईल, असे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सोमवारी येथे सांगितले. (The burden on the back of the students will be reduced Deepak Kesarkar information)

गणेशोत्सवाच्या काळात शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेऊ नयेत, या मागणीसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज केसरकर यांची भेट घेतली. त्यावेळी बोलताना केसरकर म्हणाले की, सर्व शाळांमध्ये आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासूनच द्विभाषिक पाठ्यपुस्तके देण्यात येतील. त्यासाठी एकात्मिक पुस्तक संकल्पना राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे धडे एकत्र करून एक पुस्तक तयार करण्यात येणार आहे.

- Advertisement -

पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना शाळेत जाताना दप्तराचे ओझे कमी व्हावे, यासाठी सात विविध विषयांची पुस्तके एकाच वेळी शाळेत नेण्याऐवजी संपूर्ण अभ्यासक्रमाची तीन भागात विभागणी करून एकच पुस्तक न्यावे लागणार आहे. हे पुस्तक तयार करताना गणित आणि विज्ञान या विषयांत ठिकठिकाणी मराठीबरोबरच इंग्रजीतील संकल्पनांचाही वापर केल्याने विद्यार्थ्यांना आता द्विभाषिक पाठ्यपुस्तक या शैक्षणिक वर्षांपासून उपलब्ध होत आहे. यासाठी शिक्षण विभागाने ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ तयार केली असून, तिची अंमलबजावणी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे, अशी माहिती केसरकर यांनी दिली.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील सत्तासंघर्षाचे प्रकरण आणखी पाच वर्ष चालेल, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी केले आहे. यासंदर्भात विचारले असता केसरकर यांनी त्यांनी अनवधानाने हे विधान केल्याची सारवासारव केली. गोगावले यांचे विधान ही पक्षाची भूमिका नाही. न्यायालयाचे कामकाज नियमानुसार चालते आणि न्यायालयाला सर्वाधिकार आहेत. न्यायालयीन प्रकरणाच्या बाबतीत कोणीही भाष्य करू नये, अशा सूचना देण्यात आल्याचे केसरकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – आदिवासी विद्यार्थ्यांना आता IAS, IPS होण्याची संधी, दरवर्षी 100 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -