घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमुलीवर अत्याचार करून वेश्याव्यवसायासाठी विकले

मुलीवर अत्याचार करून वेश्याव्यवसायासाठी विकले

Subscribe

अहमदनगर : अल्पवयीन मुलींना फसवून त्यांच्याशी निकाह करून अत्याचार करणारा श्रीरामूपर येथील कुख्यात गुन्हेगार मुल्ला कटर याचे आणखी एक दुष्कृत्य उघडकीस आले आहे. त्याने एका मुलीला फसवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला शेवगावमधील एका कुंटणखान्यात विकल्याची माहिती पोलीस तपासाच उघडकीससााली आहे.

पोलिसांनी पीडित मुलीला विकत घेणार्‍या कुंटणखानाचालक महिलेला अटक केली आहे. श्रीरामपूरमधील मुल्ला कटर सध्या अटकेत आहे. अल्पवयीन मुलांना फसवून त्यांच्यावर अत्याचार करणे, धर्मांतर घडवून आणणे अशा आरोपांखाली मुल्ला कटर आणि त्याचे साथीदार अटकेत आहेत. हे प्रकरण राज्यभर गाजले होते. अटकेत असलेल्या कटर याच्याकडे पोलीस कसून तपास करत आहेत. या तपासात त्याच्याकडून आणखी माहिती मिळत आहे. त्याने साथीदार बाबा चंडवाल याच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीला शेवगावच्या कुंटणखान्यात विकल्याची माहिती श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. त्यानुसार अहमदनगर पोलिसांनी शेवगाव येथील कुंटणखान्यावर छापा घालून कुंटणखाना चालविणार्‍या मिनाबाई मुसवत हिला अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -