घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रजीवघेण्या हल्ल्यांच्या घटना दुप्पट

जीवघेण्या हल्ल्यांच्या घटना दुप्पट

Subscribe

नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून, पोलिसांसमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये नाशिक शहरात २९ जीवघेण्या हल्ल्याच्या अधिक घटना घडल्या आहेत. शहरात २०२२ मध्ये २६ आणि २०२३ मध्ये ५५ प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.
प्राणघातक हल्ल्यांमध्ये तरुणांसह किशोरवयीन मुलांचा सहभाग सर्वाधिक आहे. तरुणांसह किशोरवयीन मुलांमध्ये हिंसक प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. वर्षभरातील अनेक हल्ल्यांच्या घटनांमागे क्षणिक वाद, राग अनावर होणे, पूर्ववैमनस्य कारण असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

वर्षनिहाय घटना

2022  26

- Advertisement -

2023  55

पोलिसांकडून हल्ल्यांच्या गुन्ह्यांची १०० टक्के उकल

नाशिक शहरात २०२२ मध्ये घडलेल्या २६ पैकी २५ प्राणघातक हल्ल्याची उकल पोलिसांनी केली आहे. तर २०२३ मधील ५५ पैकी ५५ प्राणघातक गुन्ह्यांची उकल पोलिसांनी केली आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. पोलिसांनी संशयितांना वेळीच ताब्यात घेतल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेचे वातावरणही निर्माण झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -