घरमहाराष्ट्रराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल महाराष्ट्र दौऱ्यावर, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल महाराष्ट्र दौऱ्यावर, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

Subscribe

मुंबई – राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ही भेट सदिच्छा भेट असल्याचं सांगितलं जातंय.

अजित डोवाल यांनी आज सकाळीच राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली असल्याची माहिती समोर येतेय. मात्र, नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली हे कळू शकलेलं नाही. त्यानंतर अजित डोवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले.

- Advertisement -

राज्यपालांची भेट घेतल्यानंतर अजित डोवाल मुख्यमंत्र्यांच्या शासकीय वर्षा या निवासस्थानी गेले. तेथे त्यांनी वर्षा बंगल्यावरील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. दरम्यान, ते आज विविध नेत्यांना भेटी देणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांपासून राजकीय नाट्य रंगलं आहे. या राजकीय नाट्याचे पडसाद केंद्रीय स्तरावर उमटले आहे. तसेच, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही अनेक वादग्रस्त वक्तव्य याच काळात चर्चेत राहिली. या सर्व पार्श्वभूमीवर अजित डोवालांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -