घरमहाराष्ट्रविघनहर्ता बाप्पाला मंदीचा फटका; मूर्तीचे भाव १५ टक्क्यांनी वाढले

विघनहर्ता बाप्पाला मंदीचा फटका; मूर्तीचे भाव १५ टक्क्यांनी वाढले

Subscribe

मंदी आणि जीएसटीमुळे यावर्षी गणेश मूर्तींचे भाव कडाडले आहेत. १५ टक्के दरवाढीचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. मात्र, श्रद्धेचा प्रश्न असल्याने ग्राहक अधिकचे पैसे देऊन मूर्ती खरेदी करत आहेत.

देश मंदीच्या गडद छायेत असून यातून विघनहर्ता गणपती बाप्पा देखील सुटले नाहीत. मंदी आणि जीएसटीमुळे यावर्षी गणेश मूर्तींचे भाव कडाडले आहेत. १५ टक्के दरवाढीचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. मात्र, श्रद्धेचा प्रश्न असल्याने ग्राहक अधिकचे पैसे देऊन मूर्ती खरेदी करत आहेत. परंतु, सरकारवर मात्र त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने वेळीच लक्ष घालावे असे नागरिकांचे म्हणणे आहे.

ग्राहकांमध्ये नाराजी लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज

महाराष्ट्रात मंदी अधिकच जाणवत आहे. कारण उद्योग नगरी म्हणून उदयास आलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक कामगारांना नामांकित कंपनीमधून काढण्यात आले आहे. तर दुसरीकडे विघनहर्ता गणपती बाप्पाच्या मूर्तींचे भाव पंधरा टक्क्यांनी वाढले असून उत्पन्न निम्म्याने कमी झाले आहे. हे सर्व मंदी आणि जीएसटीचा परिणाम असल्याचे मूर्ती विक्री करणारे व्यवसायीक सांगतात. निम्म्या कामगारांना देखील काढून टाकण्यात आल्याने त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरवर्षी गोरख कुंभार हे ४ हजार गणेश मूर्ती बनवतात मात्र, यावर्षी केवळ २ हजार मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. त्यांना गणेश मूर्ती जाणार नाहीत, अशी भीती होती. त्यात कडाडले भाव यामुळे अनेक ग्राहकांनी यावर्षी पाठ फिरवल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

कामगारांना काढल्यानंतर घरातीलच व्यक्ती कामात मदत करत आहेत. मूर्ती कमी किंमतीत द्यायला परवडत नसल्याचे व्यवसायिक सांगतात. गेल्या तीस वर्षांपासून कुंभार कुटुंब हे मूर्ती तयार करून विक्री करण्याचे काम करतात. मात्र, एवढी वाईट वेळ व्यवसायावर आली नव्हती, असे ही ते म्हणाले. तर दुसरीकडे गणेश मूर्तींचे भाव वाढल्याने ग्राहक नाराज झाले आहेत. मात्र, श्रद्धे पोटी गणपतीची मूर्ती खरेदी करत असून मंदीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. यावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे असल्याचे ग्राहकांनी सांगितले आहे.


हेही वाचा – यंदा लाल मातीच्या मूर्तींना ग्राहकांकडून पसंती

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -