Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र H3N2 Influenza चा धोका वाढला, कोरोनासारखीच लक्षणे आणि उपाय!

H3N2 Influenza चा धोका वाढला, कोरोनासारखीच लक्षणे आणि उपाय!

Subscribe

H3N2 Influenza | कोरोनाप्रमाणेच H3N2 इन्फ्लूंएंजाचा सर्वाधिक धोका लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठांना आहे. म्हणजेच, ज्याची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांना या संसर्गाचा धोका अधिक असल्याचं म्हटलं जातंय. 

H3N2 Influenza | मुंबई – कोरोनाचा संसर्ग कमी झालेला असला तरीही H3N2 इन्फ्लूंएंजाचा धोका वाढला आहे. सातत्याने बदलत जाणाऱ्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये सर्दी, खोकला, ताप, आदी आजारांत वाढ झाली आहे. कोरोनाप्रमाणेच H3N2 इन्फ्लूंएंजाची लक्षणेही सर्दी, खोकला, ताप आदी असल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. या लक्षणांवरून राज्यातील अनेक रुग्णालयात रुग्ण दाखल झाले आहेत. कोरोनाप्रमाणेच H3N2 इन्फ्लूंएंजाचा सर्वाधिक धोका लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठांना आहे. म्हणजेच, ज्याची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्यांना या संसर्गाचा धोका अधिक असल्याचं म्हटलं जातंय.

H3N2 इन्फ्लूंएंजाच्या संसर्गामुळे राज्यात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, मुंबई आणि पुण्यात रुग्ण वाढले आहेत. देशातही रुग्णांची झपाट्याने वाढ होतेय. त्यामुळे हा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, सॅनिटायजरचा वापर करणे आदी संसर्ग प्रतिबंधक नियमांचं पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

- Advertisement -

लक्षणे काय

लहान मुलांना तीव्र ताप, पोटदुखी, मळमळ, उलट्या, खोकला, सर्दी, कफ न निघणे आदी लक्षणे जाणवल्यास त्वरीत बालरोगतज्ज्ञांकडे उपचारांसाठी घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसंच, काही बालरुग्णांमध्ये न्युमोनियाचीही लक्षणे आढळत आहेत.

- Advertisement -

गर्भवती महिलांनी घ्या काळजी

तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप असणे, खोकला, सर्दी, जास्त कफ, अंगदुखी, डोकेदुखी, ब्राँकायटिस आदी लक्षणे गर्भवती महिलांना जाणवत असली तर त्यांनी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

प्रौढांमध्येही संक्रमण

छाती गच्च वाटणे, तीन दिवसांपेक्षा जास्त खोकला, जुलाब, मळमळ, डोकेदुखी, अशक्तपणा आदी लक्षणे प्रौढांमध्ये दिसतात. वृद्धांच्या फुफ्फुसात त्रास होत असेल तर त्यांनी त्वरीत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

उपाय काय?

सामाजिक अंतर राखणे, मास्क वापरणे, सॅनिटायजरचा वापर करून कोरोनावर प्रतिबंध करण्यात आला. लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने कोरोनावर आळा घालता आला. त्यापद्धतीनेच H3N2 इन्फ्लूंएंजाचा संसर्ग रोखण्यासाठी याच नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. तसंच, लहान मुलांचं संसर्ग लसीकरण त्वरीत करून घेण्याचे आवाहन बालरोगतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे.

- Advertisment -