घरमहाराष्ट्रहिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावरून गाजणार

हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावरून गाजणार

Subscribe

Maharashtra Assembly 2022 | तिसऱ्या दिवशी कोणते मुद्दे छेडले जातात, विरोधक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अडून बसतात का, नवे प्रस्ताव पटलावर येतात का, तारांकित प्रश्न उपस्थित केले जातात का हे पाहावं लागणार आहे. 

नागपूर – नागपूर सुधार प्रन्यास नियोजन प्राधिकरण भूखंड वितरण घोटाळ्यावरून विधिमंडळाचा दुसरा दिवस वादळी ठरला. या प्रकरणावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. हाच मुद्दा घेऊन विरोधक आजही विधिमंडळात आक्रमक पाहायला मिळतील. तर, विरोधकांवर पलटवार करण्यासाठी सत्ताधारीही सज्ज झाले आहेत. याशिवाय, आजचा दिवस कोणत्या मुद्द्यांवरून गाजतोय हे पाहावं लागेल.

हेही वाचा – विरोधी पक्ष संपूर्ण सहकार्य करत असताना माईक बंद पडला…, अजित पवारांकडून निषेध

- Advertisement -

सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहाने लवकर काम गुंडाळले. मात्र, दुसरा दिवस वादळी ठरला. सभागृहात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. विकासकामे, रस्तेविकास, रुग्णालयांचा विकास, मुंबईचा कायापालट, समृद्धी महामार्ग, श्रद्धा वालकर प्रकरण, लव्ह जिहादविरोधी कायदा या विविध मुद्द्यांवरून विधानसभा गाजली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध प्रश्नांवर उत्तरे देत विकासकामे जलदगतीने करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा भूखंड घोटाळ्यावरून विरोधकांचा सभात्याग, मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यावर ठाम

- Advertisement -

तर, दुसरीकडे विधान परिषदेत फक्त नागपूर भूखंड घोटाळा प्रकरणावरच चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पॉइंट ऑफ इन्फोर्मेशनअंतर्गत नागपूर भूखंड घोटाळा प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले. यावरून त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या प्रश्नांना पलटवार करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू लावून धरली. विधान परिषद तहकूब झाल्यानंतर हा मुद्दा विधानसभेत गेला. तिथेही यावरून प्रचंड गदारोळ झाला. अखेर, बोलू दिले जात नाही या मुद्द्यावरून विरोधकांनी सभात्याग केला. विरोधकांचा सभात्याग झाल्यानंतर अर्ध्या तासांनी विधानसभेचं कामकाजही स्थगित झाले. त्यानंतर विरोधक-सत्ताधारी यांनी विधान भवनाच्या आवारातच माध्यमांसमोर एकमेकांवर आगपाखड करत स्वतःची बाजू लावून धरली.

तिसऱ्या दिवशी कोणते मुद्दे छेडले जातात, विरोधक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी अडून बसतात का, नवे प्रस्ताव पटलावर येतात का, किती तारांकित प्रश्न उपस्थित केले जातात हे पाहावं लागणार आहे.

हेही वाचा – न्यायालयाने स्थगिती दिलेल्या प्रकरणात सरकारचा हस्तक्षेप; मुख्यमंत्री शिंदेंवर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आज, तिसऱ्या दिवशी ११ मोर्चे निघणार आहेत. यामध्ये लव्ह जिहादविरोधी कायद्याच्या मागणीसाठी हिंदू जनजागृती समितीकडूनही मोर्चा निघणार आहे. मुस्लिम आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी एमआयएमने मोर्चाचे नियोजन केले आहे. तर, इतर छोटे-मोठे मोर्चेही आज विधान भवन परिसरात येणार आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -