घरमहाराष्ट्रMumbai : मोरा बंदराच्या गाळात रुतल्या तीन बोटी, 500 पेक्षा अधिक प्रवाशांना...

Mumbai : मोरा बंदराच्या गाळात रुतल्या तीन बोटी, 500 पेक्षा अधिक प्रवाशांना भरसमुद्रातून काढले बाहेर

Subscribe

घारापूरी बेटावरून येणाऱ्या तीन बोटी उरणजवळ असलेल्या मोरा बंदरात अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. यांतील सुमारे 500 प्रवाशांना भरसमुद्रातून बाहेर काढण्यात आले आहे.

मुंबई : महाशिवरात्रीनिमित्त मुंबईजवळ असलेल्या घारापुरी बेटावर हजारो भक्तांनी गर्दी केली होती. शिवलेणी आणि त्रिमूर्तीच्या दर्शनासाठी हजारो भाविक हे शुक्रवारी (ता. 08 मार्च) घारापुरी बेटावर पोहोचले होते. परंतु, संध्याकाळच्या वेळी दर्शन घेऊन परतणाऱ्या तीन बोटी या मोरा बंदराच्या गाळात रुतल्या. या बोटींमध्ये जवळपास 500 पेक्षा अधिक प्रवासी होते. उरणजवळ असलेल्या मोरा बंदरात ही धक्कादायक घटना घडली.  परंतु,  सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर या बोटीतील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. (Three boats got stuck in Mora port, more than 500 passengers were rescued from the sea)

हेही वाचा… Food Poisoning : महाशिवरात्रीला शिंगाड्याचे पीठ खाणाऱ्या भाविकांना विषबाधा, नागपुरात खळबळ

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, महाशिवरात्रीनिमित्त हजारो भक्तांनी शिवलेणी आणि त्रिमूर्तीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. तर महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांच्या सुरक्षितता आणि जाण्या-येण्याची व्यवस्था पोलीस, बंदर, महसूल यंत्रणेसह ग्रामपंचायत, नागरी सुरक्षा दल आणि सामाजिक संस्थेचे कार्यकर्त्यांनी सोय करण्यात आली होती. मात्र, प्रशानसनाचा स्थानिक व्यवस्थेशो काहीच ताळमेळ नसल्याचे त्यावेळी पाहायला मिळाले. घारापुरी बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मोरा बंदर ते घारापुरी बोटींची सोय करण्यात आली होती. सकाळपासून झालेली गर्दी दुपारनंतर काही प्रमाणात कमी होऊ लागली. पण दुपारच्या वेळी घारापुरी बेटावरून निघालेल्या तीन बोटी या उरणजवळ असलेल्या मोरा बंदरातील गाळात रुतल्याची माहिती समोर आली.

मोरा बंदरापासून अवघ्या 10 मिनिटांच्या अंतरावर तीन बोटी अडकल्याची माहिती समोर आल्यानंतर खळबळ उडाली. या तिन्ही बोटींमध्ये सुमारे 500 पेक्षा अधिक प्रवासी अडकून पडले होते. अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ या बोटीतील महिलांना, वृद्धांना आणि चिमुकल्यांना पाणी न मिळाल्याने त्यांचे हाल झाल्याचेही सांगण्यात आले. परंतु, ही घटना घडल्यानंतर अथक प्रयत्न केल्यानंतर खचाखच भाविकांनी भरलेल्या राम अयोध्या आणि जय गणेश या बोटी बंदरापर्यंत पोहोचल्या. ज्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. पंरतु, प्रशासनाच्या ढिसाळ आणि नियोजनशून्य कारभाराबाबत शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -