घरमहाराष्ट्रभंडाऱ्यात दिवाळीच्या दिवशीच ३ सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

भंडाऱ्यात दिवाळीच्या दिवशीच ३ सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

Subscribe

दिवाळी सणाच्या निमित्ताने संबंध देश आणि राज्यभरात उत्साह पाहायला मिळत आहे. अनलॉक झाल्यामुळे लोक दिवाळीसाठी बाहेर पडून या सणाचा आनंद घेत आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यातील मेश्राम कुटुंबियावर दिवाळीच्या दिवशीच आभाळ कोसळले. परंपरेनुसार शेळ्या-मेंढ्यांना तलावावर आंघोळीसाठी घेऊन गेले असताना तीन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पुयार येथे घडली आहे.

आज सकाळी (शनिवार) ११.३० वाजता मधुकर नीळकंठ मेश्राम (४५), सुधाकर नीळकंठ मेश्राम (४३) आणि प्रदीप नीळकंठ मेश्राम (३९) अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीत शेळ्यामेंढ्यांना आंघोळ घालण्याची परंपरा असल्यामुळे हे तिघे भाऊ तलावावर गेले होते. तब्बल १०० शेळ्या-मेंढ्या त्यांच्याकडे होत्या. मोठा भाऊ मधुकर हा पहिला पाण्यात जाऊन आंघोळ घालू लागला. मात्र शेळ्या-मेंढ्या बाहेर काढत असताना मधुकर पाण्यात बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी मधला भाऊ सुधाकर देखील पाण्यात गेला. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तोही बुडू लागला. अखेर सर्वात लहान भाऊ प्रदीप देखील पाण्यात गेला. मात्र त्यालाही दोघांना वाचविणे जमले नाही.

- Advertisement -

एकमेकांना वाचविण्याच्या नादात तिघे भाऊ पाण्यात बुडाले. यावेळी तिथे मधुकर मेश्राम यांचा १३ वर्षीय मुलगा तुषार देखील उपस्थित होता. त्याने ही घटना घडत असताना मोबाईलवरून कुटुंबियांना याची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थ आणि नातेवाईक यांनी तलावाजवळ धाव घेतली. तिघांचेही मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आले आहेत. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चहांदे, पोलीस नाइक दुर्योधन वकेकार, पोलीस अंमलदार संदीप रोकडे यांनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेमुळे संबंध पुयार गावावर शोककळा पसरली आहे. तर मेश्राम कुटुंबियांवर आभळच कोसळले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -