घरताज्या घडामोडीअफवा पसरली आणि जमावाने चोर समजून तीन प्रवाशांची हत्या केली

अफवा पसरली आणि जमावाने चोर समजून तीन प्रवाशांची हत्या केली

Subscribe

राज्यात असलेल्या टाळेबंदीच्या वातावरणात रात्रीच्या वेळी चोर आणि दरोडेखोर यांचा ग्रामीण भागात वावर वाढतोय, अशी अफवा गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागांमध्ये पसरली आहे. त्यामुळे या भागामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. अशातच गुरूवारी रात्री गडचिंचले येथील ग्रामस्थांनी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या तीन व्यक्तींना चोर असल्याच्या गैरसमजातून दगड आणि इतर साहित्याने मारून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास दाभाडी – खानवेल मार्गावर नाशिक कडून येणाऱ्या एका वाहनाला केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ गावकऱ्यांनी रोखले. या प्रवाशांकडे विचारपूस केल्यानंतर गावकऱ्यांनी दगड आणि इतर साहित्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये चालकासह दोन प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती कासा पोलिसांनी दिली आहे.
घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलिसांचा मोठा फौजफाटा पोहोचला आहे. घटनास्थळी पोलिसांच्या वाहनांची नासधूस केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

- Advertisement -

ज्या तीन प्रवाशांचा मृत्यू झाला ते महंत रामगिरी महाराज यांच्या अंत्यविधीसाठी गुजरातला जात होते. यावेळी गावकऱ्यांनी चोर समजून त्यांना ठार केले. मयत सुशीलगिरी महाराज, ड्रायव्हर निळू हे कांदिवली (पूर्व) गंगानागर येथे राहत होते. तर चिकने महाराज हे जोगेश्वरी येथे राहण्यास होते.

दोन दिवसांपूर्वी डहाणू तालुक्यातील चारोटी गावाजवळ सारणी गावात देखील असाच एक प्रकार घडला होता. पोलीस आणि ठाणे येथील डॉक्टरांच्या पथकावर दगडफेक करण्यात आली होती. यात दोन पोलीस जखमी झाले होते. तसेच गाडीची तोडफोड करण्यात आली होती. दरम्यान पालघर जिल्हा पोलिसांनी देखील समाजमाध्यमांवर पसणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -