घरमहाराष्ट्रसामाजिक बहिष्काराचे निम्मे गुन्हे कोकणात, ही आहेत कारण

सामाजिक बहिष्काराचे निम्मे गुन्हे कोकणात, ही आहेत कारण

Subscribe

एखादी व्यक्ती किंवा व्यक्तींच्या समूहावर बहिष्कार टाकणे हा कायद्याने गुन्हा आहे. कारण सामाजिक बहिष्कार हा संविधानाच्या भाग ३ मध्ये समावेश केलेल्या व्यक्तीच्या मूलभूत हक्काचा भंग आहे. मात्र, असे असताना देखील महाराष्ट्रात अजूनही विविध शहरात सामाजिक बहिष्कार घालण्याची किंवा वाळीत टाकण्याची अमानुष प्रथा अजूनही काही ठिकाणी प्रचलित असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, या प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी इतर कायदे प्रभावी ठरत नसल्याने आता राज्य सरकारने सामाजिक बहिष्कारावर प्रतिबंध करण्यासाठी ‘महाराष्ट्र समाजिक बहिष्कार यापासून व्यक्तींचे संरक्षण अधिनियम २०१६’ लागू करण्यात आला आहे. परंतु, कायदे असून देखील बऱ्याच ठिकाणी समाजिक बहिष्काराच्या घटना घडताना समोर येतात. तर याचे निम्मे गुन्हे कोकणात घडत असल्याचे बऱ्याचदा समोर येतात. दरम्यान, सामाजिक बहिष्कार गुन्हा म्हणजे नेमके काय? आणि कोकणात हे गुन्हे आढळून येण्याची कारण कोणती जाणून घेऊया.

सामाजिक बहिष्कार म्हणजे काय?

सामाजिक बहिष्कार म्हणजे एखादी व्यक्ती किंवा व्यक्तींच्या समूहाला वाळीत टाकणे, त्याला सामाजिक बहिष्कार म्हटले जाते.

- Advertisement -

ही कृत्य केल्यास सामाजिक बहिष्कार ग्राह्य धरण्यात येतो

  • विवाह, अत्यंविधी किंवा इतर विधी संस्कार पाडण्याच्या व्यक्तीच्या अधिकारास नाकारणे
  • एखाद्या व्यक्तीला जातीवरुन वाळीत टाकणे
  • सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, प्रार्थनासभा, समाज मेळावा सभा किंवा मिरवणूकीमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध करणे
  • समाजातील इतर सदस्यांना त्या व्यक्तीशी सामाजिक धार्मिक तसेच आर्थिक संबंध तोडण्यास प्रवृत्त करणे किंवा चिथावणी देणे
  • समाजातील मुलांना इतर समाजातील मुलांशी खेळण्यास बंदी घालणे
  • समाजातील एखाद्या सदस्याला विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करण्यास किंवा विशिष्ट भाषेचा वापर करण्यास भाग पाडणे

सामाजिक बहिष्कारासाठी शिक्षा

सामाजिक बहिष्कारासाठी तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा १ लाख रुपये दंडाची शिक्षा. या दोन शिक्षांपैकी एक किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

ही आहेत कारण

आंतरजातीय विवाह

- Advertisement -

सर्वच ठिकाणी आंतरजातीय विवाहाला विरोध केला जातो. एखाद्या व्यक्तींने जातीबाह्य विवाह केल्यास त्या व्यक्तीला मान्यता दिली जात नाही. तसेच त्यांच्या कुटुंबावर देखील टीका केली जाते. त्यानंतर त्या संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकले जाते. त्या व्यक्तीशी किंवा त्या कुटुंबातील व्यक्तींशी कोणाताही संबंध ठेवला जात नाही. तसेच त्यांना कोणत्याही कार्यक्रमात सहभागी देखील करुन घेतले जात नाही

व्यक्तीला जातीवरुन वाळीत टाकणे

जातीवरुन एखाद्या व्यक्तीला बोलणे गुन्हा मानला जातो. मात्र, हा गुन्हा असला तरी देखील बऱ्याच ठिकाणी जातीवर एखाद्या व्यक्तीला बोले जाते. जर एखादी व्यक्ती इतर समाजातील असली तर त्या व्यक्तीला जातीवरुन वाळीत टाकण्यात येते. त्या व्यक्तीला कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी करुन घेतले जात नाही.

इतर जातीच्या व्यक्तीला धार्मिक कार्यक्रमात प्रतिबंध करणे

इतर समाजाच्या व्यक्तीला सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, प्रार्थनासभा, समाज मेळावा सभा किंवा मिरवणूकीमध्ये सहभागी होण्यास प्रतिबंध केले जाते. हा गुन्हा असला तरी देखील हे प्रकार अजूनही बऱ्याच ठिकाणी घडत असल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – चिथावणीखोर वक्तव्यामुळे अभिनेते मिथुन चक्रवर्ती अडचणीत, उच्च न्यायालयाला दिलं स्पष्टीकरण


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -