पिंपरी-चिंचवडमध्ये शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू; एक गंभीर

पथदिवे बसवत असताना विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Three workers die and one injured on shock in Pimpri-Chinchwad
पिंपरी-चिंचवडमध्ये शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू;

पथदिवे बसवत असताना विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना हिंजवडी परिसरात घडली आहे. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली असून यात एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. लोखंडी शिडी घेऊन जात असताना विजेच्या तारेला स्पर्श होऊन शॉक लागला, असे पोलिसांनी सांगितले आहे. सागर आयप्पा माशाळकर (२०), सागर कूपु पारंडेकर (१९), राजू कुपु पारंडेकर (३५), या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून एक कामगार गंभीर जखमी झाला आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर माशाळकर, सागर पारंडेकर, राजू पारंडेकरसह आणखी एक कामगार, असे चार जण हिंजवडी एमआयडीसी फेज तीन येथे रस्त्यावर पथदिवे बसवत होते. त्यावेळी पथदिवे बसवून कामगार पुढील पथदिवे बसविण्यासाठी लोखंडी शिडी पुढे ढकलत घेऊन जात होते. तेव्हा, पथदिव्यांच्या वरून जाणाऱ्या विद्युत प्रवाह असणाऱ्या विजेच्या तारेला शिडीचा स्पर्श झाला. दरम्यान, विद्युत प्रवाह शिडीमध्ये उतरल्याने चार जणांना शॉक लागला. या घटनेत तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, याच कंत्राट बाबर नावाच्या व्यक्तीला दिले असून त्यांच्या मार्फत हे सर्व कामगार पथदिवे बसविण्याचे काम करत होते. याप्रकरणी घटनेचा अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.


हेही वाचा – येऊर मधील वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका!