घरमहाराष्ट्रVideo : चंद्रपूरमधील शिवना नदी पात्रता अडकला वाघ

Video : चंद्रपूरमधील शिवना नदी पात्रता अडकला वाघ

Subscribe

चंद्रपूर जिल्ह्यातील शिवना नदी पात्रातील दोन दगडांच्या फटीत वाघ अडकला असून या घटनेत वाघ गंभीर जखमी झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील जुना कुनाडा गावात असलेल्या शिवना नदी पात्रातील दोन दगडांच्या फटीत वाघ अडकल्याची घटना घडली आहे. हा वाघ स्वत:ला वाचवण्यासाठी आतोनात प्रयत्न करत असून या अडकलेल्या वाघाला पाहण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती. दरम्यान, वन विभागाच्या रेस्क्यू टीमकडून वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

दोन दगडांच्यामध्ये अडकला वाघ

मिळालेल्या माहितीनुसार; आठवडाभरापासून नर वाघाने चारगाव, कुनाडा, देऊरवाडा भागात दहशत निर्माण केली होती. तसेच दोन दिवसांपूर्वी या वाघाने चारगाव खेड्यातील तेलवासा ओपन कास्ट खाणीजवळ राहणाऱ्या नागराव पाटील टेकम या शेतकऱ्याच्या शेताजवळ वाघाने टेहाळणी केली होती. तसेच यावेळी त्यांनी त्याठिकाणी असलेल्या बैलावर हल्ला देखील केला होता. या घटनेमध्ये बैल गंभीर जखमी झाला होता. हा वाघ शिवना नदी पात्रातून जात असताना तो मोठ्या दोन दगडांच्या मध्ये अडकल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसेकर यांना मिळाली. या मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांना दूर करत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि वाघाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले.

- Advertisement -

वाघाला बाहेर काढण्यासाठी वन विभागाने क्रेनची मदत घेत पिंजऱ्यात कोंबड्या टाकल्या. जेणे करुन तो त्या कोंबड्यांना पाहून उडी मारेल. मात्र, वाघ त्या दोन दगडामध्ये अडकल्याने गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, खूप वेळाने त्यांने स्वत:ची सुटका केली आहे. तसेच त्याला चालता देखील येत नसल्याने त्याने तो बाजुला असलेल्या नाल्यात जाऊन बसला आहे. सध्या वाघ जिथे आहे, तिथे जाण्यासाठी मार्ग नसल्याने आणि अंधार पडत असल्याने वन विभागाने वाघाला पकडण्याचे प्रयत्न आज थांबवले आहेत. वन विभागाने सांगितले की, जखमी झाल्यामुळे वाघ तिथून कुठेही जाणार नाही त्यामुळे उद्या सकाळी त्याला बाहेर काढले जाणार आहे.


हेही वाचा  – चक्रीवादळाच्या शक्यतेने जिल्हा प्रशासन सतर्क; कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -